मंगळवार दि. 01.04. 2025 रोजी होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संस्थेचे शिष्टमंडळ श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुर येथे विविध विषयाच्या निगडित असलेले अधिकारी यांच्याबरोबर नियोजित ठरल्याप्रमाणे बैठका मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्या. खालील प्रमाणे ▪️ निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी सोलापूर. ▪️ उपजिल्हाधिकारी( महसूल) सोलापूर. ▪️ सहआयुक्त समाज कल्याण विभाग सोलापूर. ▪️ अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर. ▪️ए.डी. चाबुकस्वर वसुली अधिकारी लीडकॉम सोलापूर. यांच्याबरोबर विविध विषयावर चर्चा झाली तसेच जिल्ह्यातील समाज बांधवांच्या विविध अडचणी संदर्भात संस्थेकडे लेखी अर्ज आले आहेत जसे की नोकरी रोजगार शिक्षण जात दाखला निवारा राज्य सरकारच्या अनेक योजना पासून समाज बांधव वंचित आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात आपल्या कार्यक्षेत्रातील होलार समाजाच्या वस्त्यांमध्ये होलार समाजासाठी असलेल्या शासकीय योजनेबाबत आपल्या स्तरावरून जनजागृती करण्याच्या दृष्टीने मेळाव्या आयोजित करावे ज्या ठिकाणी होलार समाजाची वस्ती आहे त्या ठिकाणी विभागाच्या योजनेची माहिती द्यावी यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजना, बचत गट मिनी ट्रॅक्टर तसेच शैक्षणिक व आर्थिक उन्नतीच्या योजनेची माहिती तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी नियमांमध्ये नेयम क्रमांक 4 (3) मध्ये खालील प्रमाणे नमूद केलेले आहे. अर्जदार, वरील पोट-नेयम (2) चे नमूद केलेला कोणताही दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ असेल तर अशा बाबतीत, अर्जदार आपल्या शपथपत्रांमध्ये त्या विषयाचे कारण नमूद करील आणि सक्षम अधिकारी त्यावर निर्णय घेईल.व होलार समाजाला अथवा समाजातील जो वंचित घटक असेल त्यांना जात प्रमाणपत्र देताना काही कागदपत्राचा अभाव असल्यास गृहचौकशी करून जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी जेणेकरून होलार समाजाला शासकीय योजनेचा लाभ घेता येईल. व ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत दिली जावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे पुणे. यांनी केली आहे या विषयावर वरील सर्व अधिकारी यांनी सखोल अभ्यास व विचार करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लवकरच कारवाईला सुरुवात होणार आहे तसेच त्यावेळी उपस्थित शिष्टमंडळ खालील प्रमाणे ▪️ जगन्नाथ पारसे राज्य खजिनदार ▪️सौ. शोभा मॅडम उपाध्यक्ष राज्य ▪️ अक्षय भजनावळे इंजिनियर सांगोला. ▪️ सुरेश सदाशिव आयवळे सांगोला. नितीन ऐवळे सदस्य ▪️ सिताराम ऐवळे सदस्य ▪️ मारुती जावीर जत सदस्य ▪️ रुक्मिणी आयवळे सदस्य ▪️मलकारी करडे सदस्य जत. यांच्या उपस्थितीत बैठका उत्साहात संपन्न झाल्या होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-