महाराष्ट्रातील होलार समाजाला जातप्रमाणपत्र,व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या अडचणी सोडवल्या जातील... मा.सुनीलजी वारे सर महासंचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने. श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था पुणे यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे श्री .दादासाहेब गित्ते उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख, प्रशिक्षण विभाग बार्टी पुणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषवले सामाजिक न्याय भवन लातुर येथे आज दि.२१/१/२०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) ,व जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समिती लातुर व महसुल विभागाच्या वतीने लातुर येथे होलार समाजासाठी एक दिवशीय विभागीय कार्यशाळा शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख पाहुणे बार्टीचे उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी वरील उदगार काढले ते बोलताना पुढे म्हणाले," होलार समाज दुर्लक्षित असा समाज आहे या समाजात शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे.... समाजाच्या जातप्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्रासाठी होलार समाजाला ज्या अडचणी येतात त्या प्रामुख्याने सोडविल्या जातील यावेळी लातुर जातपडताळणी विभागाचे प्रमुख तेजस माळवदकर यांनीही सखोल मार्गदर्शन करुन समाजाला जात पडताळणीतील अडचणी दुर केल्या जातील असे आश्वासन दिले यावेळी होलार समाज चळवळीचे अभ्यासक लेखक, साहित्यिक प्रा. वैजनाथ सुरनर यांनी लातुर, नांदेड, धाराशिव, जिल्ह्यातील समाजाला जातप्रमाणपत्र व पडताळणी साठी येणाऱ्या अडचणी सविस्तर अभ्यास पुर्ण मांडल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक होलार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे व नितीन सहारे यांनी केले तर आभार रामचंद्र वंगाटे यांनी मानले.... श्री. नामदेवराव आयवळे, श्री बालाजी नामदास यांनी समाजाच्या व्यथा व अडचणी प्रश्नरुपाने मांडल्या ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी अतिशय परिश्रम यांनी घेतले. श्री.महावीर आयवळे,, अविनाश आयवळे, प्रकाश टाळकुटे, मंगेश होनमाने, अमोल टाळकुटे, अशोक ढोबळे, अमोल केंगार, मल्हारी जावीर, बालाजी नामदास, बालाजी केंगार, अक्षय जावीर, महेश जावीर, संतोष ढोबळे, रवी आयवळे, अनिल गोरवे, विकास आयवळे, सचिन जावीर, योगेश आयवळे, विशाल आयवळे, सुनील होनमाने, लक्ष्मण केंगार, रोहन हनुमाने, तसेच सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी, सर्व समता दुत त्यावेळी उपस्थित होते कार्यशाळा मोठ्या थाटात संपन्न झाली.
Featured Post
