नवीन वर्ष नवीन संकल्पना १/१/ २०२५ होलार समाज सामाजिक संस्था, पुणे (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य ) संस्थेच्या वतीने ह्या सर्वांनुमते मान्यता देण्यात आलेल्या आहेत. ठराव क्रमांक-४८- ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असल्यामुळे महाराष्ट्रातून वंचित गरीब गरजू शालेय महाविद्यालय व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी व समाज बांधवांनी हाताला काम मिळावे असे .संस्थेकडे सातत्याने मागणी केलेली आहे त्या अनुषंगाने संस्था प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. १ . समाज विकास विभाग स्त्री संसाधन केंद्र (सक्षमा कक्ष) स्थापन करणार. २ . महाराष्ट्र जलसंवर्धन प्रकल्प अंतर्गत हजारो गरजू मुलांच्या हाताला काम दिले जाणार गरजू मुलांनी संस्थेकडे संपर्क साधावा. ३ . महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र पडताळणी करताना येणाऱ्या अडचणीबाबत संस्थेची संपर्क साधावा योग्य ते मदत केली जाईल. ४ . संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे गरीब गरजू हुशार विद्यार्थी दत्तक योजना ५ . वंचित गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवी पासून ते बारावी पर्यंतचे मराठी आणि इंग्लिश मीडियमचे क्लास मोफत सुरू करण्यात येत आहे. ६ . महिलांसाठी बचत गटासाठी विविध उपक्रम महिला लघुउद्योग मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार. ७ . संस्थेचे शिष्टमंडळ सर्व जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय विभागांना भेट देणार समाजातील अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाही.अशा सर्व प्रश्नांवर आवाज उठवणार .
Featured Post
