होलार समाज सामाजिक संस्था, पुणे (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) संस्थेच्या वतीने नवीन वर्ष नवीन संकल्पना १.१. २०२५ पासून स्त्री संसाधन केंद्र सक्षमा कक्षाची स्थापना कौटुंबिक सल्ला'आजच्या काळाची वाढती गरज आहे. सुखी अर्थव्यवस्था, चंगळवाद यामुळे आर्थिक व सामाजिक उलथापालथ होत आहे. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकाला प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे यामुळे ताण तणाव वाढत आहे. छोट्या विभक्त कुटुंबांमध्ये नातेसंबंधातून मिळणारा आधार अपुरा ठरत आहे. स्त्री- पुरुषांच्या भूमिका, परस्पराकडूनच्या अपेक्षा बदलत आहेत. त्यामुळेही कुटुंबामध्ये कलहा निर्माण होतात. याचा परिपाक म्हणजे आपल्यापैकी अनेकांना मानसिक व भावनिक समक्षाने ग्रासले आहे. अन्याय, अत्याचार, दैनंदिन स्पर्धा, ताणतणाव, कुटुंबातील विसंवाद यामुळे निर्माण होणाऱ्या भावनिक स्वरूपाच्या समस्यावर मात करण्यासाठी नातेवाईक, मित्र- मैत्रिणी यांच्याशिवाय तज्ञ अनुभवी सल्लागार, मनोज मानसोपचार तज्ञ यांची मदत अनेकदा घ्यावी लागते, कौटुंबी समस्या अनेक प्रकारच्या असू शकतात. उदा उदा. पालक व मुले तसेच भाऊ, दोन जावा, सासू- सुना यांच्या तक्रारी असू शकतात. या तक्रारीतून प्रकरण युकोपाला जाण्यापूर्वी कोणीतरी मध्यस्थी केली तर फायदा होऊ शकतो. घरातील तथा इतर नातेवाईकांनी तशी मदत केली तर ती परिणामकारण होतेच असे नाही. पण त्रयस्ताच्या मध्यस्थीत दोन्ही बाजूला न्यायाची खात्री वाटते. म्हणून आपापसातील तक्रारी पोलिसात किंवा न्यायालयात नेण्यापूर्वी स्त्री (ससाधन सक्षम कक्ष) केंद्रात नेणे फायदेशीर असते अनेकदा समस्याग्रस्त व्यक्ती आपल्या समस्या बाबत स्वतःलाच अपराधी मानत असतात. माझ्याच बाबतीत असे का घडले आहे ? म्हणून स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात. यातून निराश वाढते. कौटुंबिक- सल्लागार 'तुम्हाला या नैराश्यातून बाहेर काढून दिलासा देतो. मनातील अपराधीपणाची भावना काढून टाकण्यास मदत करतो. खरे तर तुमची तुम्हालाच मदत करायची असते. सल्लागार ' तुम्हाला फक्त मदत करीत असतो. विवाहित जीवनात प्रेम, आपलेपणा, आदर या गोष्टी नाहिश्या होतात आणि जेव्हा व्यवहारिक दृष्टिकोन तयार होतो, कुटुंब कुटुंबव्यवस्थेत कलह, द्वेष, मत्सर या गोष्टीचे वर्चस्व निर्माण होते, तेव्हा कुटुंबव्यवस्था ढासळते व कलह निर्माण होतो. आजच्या नवीन बदलत्या काळात स्त्री- पुरुषातील वाढते स्पर्धा, एकमेकांच्या पुढे जाण्याची प्रवृत्ती त्यात स्त्रीचे नोकरी, शिक्षण यामध्ये वाढत चाललेले वर्चस्व यातून निर्माण होणारे वाद, वाढत्या महागाईमुळे कमी पडणारा पैसा, मुलांचे शिक्षण, घरातील स्त्री व पुरुष दोघेही नोकरी करीत असल्यामुळे घरातील व्यक्तींना पुरेसा वेळ न देणे या गोष्टीमुळेही कुटुंबिक कलहास खतपाणी मिळते. या सर्वातून सल्ला देण्यासाठी होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. महाराष्ट्रातील ठीक ठिकाणी स्त्री ससाधन केंद्र सक्षम कक्ष सुरू करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत.
Popular Posts
-
-
होलार समाजासाठी विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली – छत्रपती संभाजीनगरात बार्टी व होलार समाज संस्थेचा उपक्रम छत्रपती संभाजीनगर, 10 जुलै 2025 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती वस्ती सुधार योजना (बार्टी), पुणे व होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. ISO 9001:2015 प्रमाणित संस्थांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भातील अडचणी, बेरोजगारी, उद्योग धोरणे व युवा गट स्थापनेविषयी समाजाला योग्य मार्गदर्शन समाज कल्याण विभागाच्या विविध योजना होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी सरकार, समाज, आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून समन्वय साधून विविध योजनेची अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा उद्देश सामाजिक करणे हा होता. कार्यशाळेची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमाचे मान्यवराच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रमुख या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून बार्टी, पुणेचे अप्पर जिल्हाधिकारी व प्रशिक्षण विभाग प्रमुख, प्रकल्प व्यवस्थापक श्री. नितीन सहारे, सचिन नांदेडकर, संबंधित जिल्ह्यांचे उपविभागीय अधिकारी, कन्नड येथील प्रांत तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, तसेच बार्टी संस्थेतील विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक बार्टीचे श्री. नितीनजी सहारे सर यांनी सादर केले. त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशांबाबत सविस्तर माहिती दिली. बार्टीच्या विविध योजना समजावून सांगितल्या उपविभागीय अधिकारी व तहसीलदार महसूल विभाग यांनी जात प्रमाणपत्र प्रक्रिया व येणाऱ्या अडचणींचे सखोल विश्लेषण केले. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जिल्हा जात पडताळणी समिती, छत्रपती संभाजीनगर यांनी मार्गदर्शन केले. होलार समाजाचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी समाजाच्या प्रमुख अडचणी अधिकार्यांच्या समोर प्रभावीपणे मांडल्या. व होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात इतिहास घडत आहे मा. सुनील वारे महासंचालक यांना व सर्व टीमचे समाज बांधवांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अनेक समाजबांधवांनी देखील आपले प्रश्न प्रत्यक्षपणे मांडले. या संवादातून अनेक शंका दूर झाल्या व उपाययोजना सुचविण्यात आल्या. कार्यक्रमाचा समारोप व आभारप्रदर्शन श्री. नितीनजी सारे यांनी केले. या कार्यशाळेमुळे होलार समाजातील नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधता आला तसेच जात पडताळणी आणि रोजगाराच्या संधींबाबत मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व कार्यक्रमाला उपस्थित समाज बांधव पदाधिकारी यांना संस्थेच्या वतीने धन्यवाद
-