्होलार समाजामध्ये प्रथम पीएचडी करणारे मा. श्री प्रा. डॉ. रघुनाथ अण्णा केंगार साहेब यांनी अचानक दिनांक 18 10 2024 रोजी प्रत्येक्षात श्री नामदेवराव श्रीरंगा आयवळे जनसंपर्क कार्यालय सामाजिक संस्था पुणे या कार्यालयात भेट देण्यात आली त्यावेळी त्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी सविधान प्रत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले जाती व्यवस्थेचे निर्मूलन ग्रंथ सप्रेम भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते संस्थेचे नाव ऐकून होतो परंतु प्रत्यक्षात भेटण्याची संधी आज मिळाली व प्रत्यक्षात पाहिल्यामुळे खरंच संस्था विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करत आहे. तसेच आपण होलार समाज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे काम करत आहात ते समाजाला दिशादर्शक असेच आहे. बोलणाऱ्या पेक्षा काम करणाऱ्यांची संख्या खूप वाढली पाहिजे समाजसेवेचा आपण जो फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री. छत्रपती शिवाजी महाराज इत्यादी विचाराचा वारसा चालवीत आहे त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी संस्थेचे संचालक श्री आत्माराम जावीर शोभा शोभा मॅडम अर्जुन खांडेकर जगन्नाथ पारसे उपस्थित होते.