होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. संस्थेच्या वतीने सर्व सभासद व कार्यकारी मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली दिनांक 11/8/2024 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालया गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न. या सभेचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी भूषवले. विषयः-महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या विविध अडचणी संदर्भात तरुणांसाठी नोकरी व्यवसाय रोजगार गरीब गरजू महिलांसाठी उद्योग उभारणे या विषयावर चर्चा तसेच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेमधून आर्थिक लाभ मिळण्यास सर्वसाधारण आवश्यक असणाऱ्या बाबीवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी या सभेचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे मार्गदर्शन करताना बोलत होते .व्यवसाय करण्यासाठी भांडवल लागते त्यासाठी संत रोहिदास व चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांच्या मार्फत अनुसूचित जातीतील चांभार, ढोर, होलार, व मोची इत्यादी आर्थिकदृष्ट्या दुर्लब व दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाह त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात प्रथमच ऐतिहासिक महामंडळ पारंपारिक व्यवसाय सोडून इतर व्यवसायाला कर्ज देत आहे त्याबद्दल माननीय धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक यांचे या सभेमध्ये टाळ्याच्या गजरात कौतुक केले व शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच समाज बांधवांनी उद्योगाकरिता कर्जाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे. तसेच श्री. दादासो करे हे बारामती वरून पुणे येथे आवर्जून सभेसाठी उपस्थित होते त्यांनी आपले समाजाबद्दलचे मत व्यक्त केले. व रोहिणी मॅडम यांनी आपले मत व्यक्त केले तसेच शोभा मॅडम यांनी आपले मत व्यक्त केले तसेच मंदा मॅडम यांनी कर्जा संदर्भात कागदपत्रांची माहिती संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच लाभार्थी महिला साखळी समूह गट तयार करण्यात आला या गटामध्ये 20 महिलाची नाव नोंदणी करण्यात आली या महिलांना कर्ज प्रकरण मंजूर करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे आम्ही पाठपुरावा करत आहोत सभेत संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी. बोलून दाखवले तसेच काही सभासद नोंदणी करण्यात आली व सुनीता हनुमंत खांडेकर यांची येवलेवाडी कोंढवा शाखा महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसेच श्री दादा आबाजी करे यांची बारामती तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी सर्व समाज बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुल सहकार्य केले . कार्यक्रमाचे आभार माननीय जगन्नाथ पारसे संस्थेचे खजिनदार यांनी आभार मानले