होलार समाज सामाजिक संस्था पुणे कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य संस्थेची कार्यकारी मंडळाची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक 11/8/2024 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे. येथे वेळ दुपारी 1.30 या वेळेत अतिशय महत्त्वाची सभा आयोजित करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. सभेपुढील विषय 1 समाजातील तरुणासाठी नोकरी व्यवसाय रोजगार जेष्ठ नागरिक अंध, अपंग, यांच्या करिता शासकीय योजनेच्या माध्यमातून मार्गदर्शन.व माहिती देणे. 2 गरीब व गरजू महिलांसाठी त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी हस्तउद्योग, व्यवसाय उद्योग उभारणे बाबत. 3 लीडकॉम मुंबई यांच्याकडे होलार समाजाचे कर्ज प्रकरणाबाबत. 4 जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा तसेच 50 वर्षांपूर्वीची नोंद मिळण्याकरिता महसूल कार्यालयामध्ये होलार समाजाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. यासंबंधी माहिती व मार्गदर्शन. 5 महिलांकरिता क्लस्टर, शॉपिंग मॉल उभारण्याबाबत. त्यासाठी फक्त महिलांचा समूह एकत्र करून नाव नोंदणी करण्याबाबत. तसेच संस्थेच्या सर्व कार्यकारिणी मंडळांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे ही विनंती. संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर. जगन्नाथ पारसे खजिनदार यांनी केले आहे.