नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार समाजात प्रथमच इतिहास घडविणारी एकमेव संस्था होलार समाज सामाजिक संस्था पुणे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य ही संस्था नियमित उपक्रम समाज उपयोगी राबवित आहे. अनुसूचित जातीची वंचित होलार समाज आर्थिक दुर्लभ व दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास होण्यासाठी विविध योजनेचे माहिती व मार्गदर्शन नियमित करते. मुख्य उद्देश हा महिलांना सक्षम करणे. जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. महिलां व मुली यांच्या बाबतीत होणारे भेदभाव थांबविणे व त्यांचा आत्म सन्मान वाढविणे. वंचित होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्रातून विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत हे इतिहासात प्रथमच घडत आहे. महाराष्ट्रातून कार्यशाळा घेऊन त्यामध्ये युवकांना उद्योजकता प्रशिक्षण समाज कल्याण मार्फत राबवित असलेल्या विविध योजना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी बाबत मार्गदर्शनासह बार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण, यूपीएससी, एमपीएससी, आयबीपीएस, जेईई नीट इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधीछत्रर्वती उपक्रमाबाबतही माहिती देण्यात येत आहे‌ जेणेकरून होलार समाजातील नागरिकांना त्याचा फायदा होईल.

Featured Post

🌿 **दैनिक प्रमाण-विचार** 🌿 📅 दिनांक: 12 एप्रिल 2026 🏢 **होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे** 🏅 ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था 👤 संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे --- ✨ **आजचा विचार:** “संस्थेची प्रगती ही सतत आढावा, सुधारणा आणि योग्य निर्णय यावर आधारित असते.” --- 🔍 **आजचा प्रमाण मुद्दा (External / Internal):** 👉 *तांत्रिक प्रगती (External Factor)* 📌 **स्पष्टीकरण:** नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याने संस्थेची कार्यक्षमता वाढते. डिजिटल साधनांचा स्वीकार केल्याने काम जलद, अचूक आणि पारदर्शक होते. --- 💡 **आजची कृती (Action Point):** ✔ संस्थेमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा आढावा घ्या ✔ नवीन डिजिटल साधनांचा विचार करा ✔ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या --- 🌱 **संदेश:** “दररोज छोटा बदल, मोठी प्रगती घडवतो.”

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts