संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई व्यवस्थापकीय संचालक, श्री. मा. धम्मज्योती गजभिये साहेब, मुंबई येथे दिनांक 29 जुलै 2024 रोजी होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, श्री. नामदेवराव आयवळे यांच्या नेतृत्वात माननीय व्यवस्थापकीय संचालक यांना विविध मागण्याचे पत्र सादर केले तसेच नामदेवराव आयवळे यांनी होलार समाजाच्या अनेक प्रश्नांना महामंडळाने मदत करावी अशी मागणी केली या बैठकीत संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था पुणे तसेच शिस्त मंडळ सदस्य सोबत श्री. जगन्नाथ पारसे, प्रभाकर करडे, रामचंद्र ऐवळे, सौ. मंदा मॅडम, सौ. सुनीता करडे व सौ. मनीषा ऐवळे, आम्ही सर्वांनी अडचणी त्यांच्या समोर मांडल्या ज्या मागण्या मान्य केले आहेत त्या मागण्यांची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी 1) होलार, चांभार, ढोर, मोची इत्यादी समाजाचे लाभार्थ्यांचे कर्ज प्रकरण तात्काळ मंजुरी व चेक वाटप केले जाणार. तारीख ठिकाण व वेळ लवकरच कळवले जाणार आहे. 2) महामंडळाकडून होलार, चांभार, ढोर , मोची,समाजाला मदत करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन तात्काळ सुरू केली जाणार आहे. कर्ज प्रकरण एजंट पासून समाज मुक्त होणार. 3) होलार समाजाकरिता व महिलांकरिता क्लस्टर उभारण्यात येणार हजारो महिलांच्या हाताला काम मिळणार. 4) महिलांकरिता 20 20 महिलांचे गट तयार केले जाणार आणि त्यांच्या आवडीचे व्यवसाय निवडावे व त्यासाठी कर्ज पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत दिले जाणार जास्तीत जास्त महिलांनी छोटे-मोठे उद्योग उभा करावेत ही विनंती या विषयाची अंमलबजावणी तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे त्याबद्दल माननीय धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक लीडकॉम मुंबई यांचे मनापासून अभिनंदन🙏 आपला विश्वासू तुमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे.