श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य ) यांनी आज दिनांक 19/7/2024 रोजी प्रत्यक्षात बार्टी.पुणे कार्यालयात भेट घेऊन महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे संस्थेमार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जाव्यात त्यामुळे होलार समाजाच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी मदत होईल. त्यावेळी मा. महासंचालक यांनी कार्यशाळा घेण्याची मान्यता देण्यात आल्या व लातूर विभागीय कार्यशाळा तात्काळ घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाजाच्या लोकांची जातीची चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता होत असलेल्या अडचणीमुळे सविस्तर चर्चा झाली.या संदर्भात बार्टी मार्फत होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या संदर्भात निर्माण झालेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. महाराष्ट्रातील होलार समाजाची सामाजिक , आर्थिक व शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्रातून विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत इतिहासात प्रथमच घडत आहे .त्याबद्दल बार्टीचे मा. महासंचालक सुनीलजी वारे सर व सर्व टीमचे मनापासून अभिनंदन. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांच्या आदेशाने श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळानी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे संस्थेमार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेऊन त्यामध्ये युवकांना उद्योजकाता प्रशिक्षण समाज कल्याण राबवित असलेल्या विविध योजना जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शनासह बार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण, यूपी एससी एमपीएससी, आयबीपीएस जेईई नीट, इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधिछत्रवृत्ती उपक्रमाबाबत ही माहिती देण्यात येत आहे. जेणेकरून होलार समाजातील नागरिकांचे वरील अडचणी सोडवण्यास मदत होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री. भगवान जावीर गुरुजी प्रेरणास्थान श्री.बबन करडे सातारा माजी नायब तहसीलदार अर्जुन खांडेकर जगन्नाथ पारसे संजय ऐवळे यांनी केले आहे.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-