महाराष्ट्रातील होलार समाजाची सामाजिक , आर्थिक व शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्रातून विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत इतिहासात प्रथमच घडत आहे .त्याबद्दल बार्टीचे मा. महासंचालक सुनीलजी वारे सर व सर्व टीमचे मनापासून अभिनंदन. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे यांच्या आदेशाने श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळानी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे संस्थेमार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेऊन त्यामध्ये युवकांना उद्योजकाता प्रशिक्षण समाज कल्याण राबवित असलेल्या विविध योजना जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शनासह बार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण, यूपी एससी एमपीएससी, आयबीपीएस जेईई नीट, इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधिछत्रवृत्ती उपक्रमाबाबत ही माहिती देण्यात येत आहे. जेणेकरून होलार समाजातील नागरिकांचे वरील अडचणी सोडवण्यास मदत होईल. जास्तीत जास्त नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री. भगवान जावीर गुरुजी प्रेरणास्थान श्री.बबन करडे सातारा माजी नायब तहसीलदार अर्जुन खांडेकर जगन्नाथ पारसे संजय ऐवळे यांनी केले आहे.
Featured Post
