नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

! वार्षिक अहवाल! २०२२ -२०२३ होलार समाज सामाजिक संस्था,ही नोंदणीकृत संस्था आहे, मार्च २०१९ मध्ये संस्थेचे रजिस्ट्रेशन झाले आहे.संसस्थेचे (कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य) मुख्य कार्यालय सर्व्ह नं. ६३४/७. अ गणपतनगर बिबेवाडी पुणे ४११ ०३७. संस्थेला अद्याप कुठलीही शासकीय मदत मिळाली नाही.सस्थेचे कार्य वैयक्तीक दावे व इतर लोकांच्या मदतीवर सुरू आहे. पांचवा वार्षिक अहवाल आपणापुढे सादर करताना खूप आनंद होत आहे. *संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे* " नोकरी मागणारे नव्हे तर रोजगार देणारे उद्योजक निर्माण व्हावेत" होलार समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्लभ व दारिद्र रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक विकास होण्यासाठी संस्थेमार्फत मागील पाच वर्षात या संस्थेने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. महाराष्ट्रातील समाज बांधवांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेचे जाळे विणण्यासोबतच एकमेकांना सहाय्य करू हा संदेश देत श्री नामदेवराव आयवळे यांनी होलार समाज सामाजिक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली लोक कल्याणच्या भावनेतून, नोकरी मागणारे नवे तर रोजगार देणारे उद्योग निर्माण व्हावेत तरुणांना रोजगार मिळावा या उद्देशाने श्री भगवान जावीर गुरुजी प्रेरणास्थान यांनी संस्थेची स्थापना पुणे येथे 8 मार्च 2019 रोजी केली केवळ 11 सभासदांच्या मदतीने सुरू झालेल्या या प्रवासाने नेहमीच विश्वासाच्या बळावर पाच हजार सभासद व होलार समाज सामाजिक संस्थेचच्या नावाने वेबसाईट सुरू केली व 42 हजार पेक्षा जास्त लोकांनी संस्थेच्या वेबसाईटला भेट तसेच अधिक टप्पा संस्थेने पार केला आहे. हा यशस्वी प्रवास व मेहनती सोबत होलर समाजाचे प्रेरणा स्थान श्री. भगवान जावीर गुरुजी यांचे संस्कार व आशीर्वाद तसेच माझी नायब तहसीलदार श्री. बबन करडे साहेब सातारा जि.एन.ऐवळे वकील साहेब तसेच अर्जुन खांडेकर सचिव जगन्नाथ पारसे यांचे मार्गदर्शन असे नामदेवराव आयवळे अभिमानाने सांगतात.तसेच त्यामुळे समाज बांधवांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि सामान्य माणसाच्या मनात घर करणारी एक विश्वासहर्थ संस्था म्हणून होलार समाज सामाजिक संस्थेचे आवर्जून उल्लेख करावा लागेल. १) संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे गरीब गरजू हुशार विद्यार्थी दत्तक योजना सुरू करण्यात आली पुणे येथे राहण्याची जेवणाची मोफत सोय करण्यात आली. २) वंचित गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवी पासून ते बारावी पर्यंतचे मराठी आणि इंग्लिश मिडीयम चे क्लासेस मोफत पुणे येथे सुरू करण्यात आले आहेत. ३) महिला बचत गटासाठी विविध उपक्रम आयोजित पुणे येथे करण्यात आले शिल्प तयार करणे एलईडी बल ट्यूबलाईट डेकोरेशन लाईट तसेच कापसाच्या वाती तयार करणे इत्यादी उपक्रम सुरू करण्यात आले. ४)मा. श्री. सुनील वारे सर महासंचालक डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. याच्याकडे नामदेवराव आयवळे हे सातत्याने पाठपुरावा महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही‌. त्यामुळे होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी चर्चा व मार्गदर्शन एक दिवशीय विभागीय कार्यशाळा घेतल्या जाव्यात अशी मागणी केल्यामुळे बार्टी, पुणे. अंतर्गत होलार समाजाच्या विकासासाठी बार्टीमार्फत विशेष विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्या बद्दल बार्टीचे महासंचालक व सर्व टीमचे मनापासून आभारी आहे. तसेच युवकांना उद्योजकात प्रशिक्षण समाज कल्याण मार्फत विविध असलेल्या विविध योजना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्रे अडचणी सोडवण्यासाठी बार्टी मार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण यूपीएससी एमपीएससी आयबीपीएस जेईई नीट, इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आधीछत्रर्वती उपक्रमाबाबतही माहिती घेण्यात येत आहे जेणेकरून महाराष्ट्रातील होलार समाजातील नागरिकांना त्याचा लाभ होईल. कुठलेही शासकीय अनुदान व शासकीय मदत नसतानाही संस्था आपले कार्य अखंडीत सुरू ठेवत आहे. व त्याचे कारण संस्थेचे सर्व देणगीदार. या सर्वाची संस्थेचे कार्य प्रत्यक्ष पाहिलेत. संस्थेला वेळ दिलात.आपल्या सर्वांमुळे संस्था यशस्वी वाटचाल करत आहे. आपले पुनश्च धन्यवाद तुमची सर्वाची संस्था अखंड लाभु देत . संस्थेकडून पुढील काळात आणखी प्रभावी सामाजिक कार्य घडेल असा विश्वास व्यक्त करतो नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र.

Featured Post

निःशुल्क उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम – बार्टी पुणे आयोजक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे सहकार्याने: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष – होलार समाज सामाजिक संस्था, पुणे कार्यक्रमाचे स्वरूप: कालावधी: 1 महिना (अनिवासी) फी: पूर्णतः मोफत (निःशुल्क) ठिकाण: महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण जिल्हा निहाय एक दिवसीय परिचय मेळावा आयोजित प्रशिक्षणाचे उद्दिष्ट: अनुसूचित जातीतील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कौशल्यांचे प्रशिक्षण देणे. प्रशिक्षणातील प्रमुख विषय: उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास कारखाना भेटी उद्योगासाठी नोंदणी व परवाने स्टार्टअप इंडिया / स्टँडअप इंडिया मुद्रा योजना / मेक इन इंडिया यशस्वी उद्योजकांशी चर्चा उद्योग निवड व उभारणी प्रक्रिया बाजारपेठेचे सर्वेक्षण महिला उद्योजकांसाठी धोरण प्रकल्प अहवाल तयार करणे निधी उभारणीचे मार्ग कर्ज योजना / महामंडळांच्या योजना कंपनी नोंदणी व प्रक्रिया विक्री व व्यवस्थापन कौशल्य अभिप्रेरणा प्रशिक्षण विविध क्षेत्रातील उद्योग संधी (कृषी, खाद्य, केमिकल, प्लास्टिक इ.) आवश्यक कागदपत्रे (प्रत्येकी 2 झेरॉक्स): जातीचा दाखला आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला / मार्कलिस्ट पॅनकार्ड 2 पासपोर्ट साईज फोटो पात्रता निकष: जात: अनुसूचित जाती (SC) वय: 18 ते 45 वर्ष शिक्षण: किमान 8वी पास महाराष्ट्रातील रहिवासी: किमान 15 वर्षे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असावी कोणत्याही बँकेचा/संस्थेचा डिफॉल्टर नसावा (क्रेडिट स्कोअर चांगला असावा) महिलांना प्राधान्य अर्ज व माहिती कशी मिळवावी: बार्टी पुणे वेबसाइटला भेट द्या: https://barti.maharashtra.gov.in जिल्हा प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करा किंवा संपर्क साधा: श्री. नामदेवराव आयवळे मो. 97649 69074 (होलार समाज सामाजिक संस्था, पुणे) निवड प्रक्रिया: जिल्हा निहाय मेळावा होईल अर्ज व कागदपत्रांची तपासणी मुलाखतीच्या आधारे निवड

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts