नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

महाराष्ट्रातील तमाम होलार बंधू आणि बहिणींना अतिशय नम्रपणे आवाहन करण्यात येते की. लातूर विभागातील होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, व सर्वागीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा, जातीचे दाखले, पडताळणी प्रमाणपत्रे काढतांना येणाऱ्या विविध अडचणी बाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे नियोजन निश्चित आहे.... मा.सुनील वारे सर महासंचालक यांच्या आदेशानुसार. श्री.नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने . होलार समाजाचे प्रेरणास्थान श्री.भगवान हारीबा जावीर गुरुजी श्री.बबन करडे साहेब श्री. दत्तात्रय करडे सर श्री. जगन्नाथ पारसे श्री. अर्जुन खांडेकर यांच्या सहकार्याने इतिहासात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे. यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक ,शैक्षणिक, अडी -अडचणी सोडवण्यासाठी विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्याबद्दल प्रथम बार्टीचे मनःपूर्वक आभारी आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होलार समाज विखरला गेला आहे होलार समाजाला भेडसावणारे अडचणी शैक्षणिक बाबीकडे झालेले दुर्लक्ष व शिक्षणातील गळतीचे प्रणाम व जातीचे अस्तित्व व जातीच्या चुकीच्या नोंदी संदर्भात तसेच स्त्रियांचे स्थान होलार व होलेर यामधील अडचणी होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी होणाऱ्या अडचणी विविध शासकीय योजनेची माहितीचा अभाव तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोचली जात नाही शिक्षणाचा अभाव उत्पन्नाचा साधनाचा अभाव रूढी परंपराचा पगडा व समाजातील आर्थिक दुर्लभ लोकांसाठी ठोस असे उपाययोजना नाहीत वेळेवर उपचार सरकारी मदत उपलब्ध होत नाही अत्याचार ग्रस्त समाज बांधवांना योग्य तो न्याय मिळत नाहीये असे निर्माण झालेल्या अडचणी त्या होलार समाजाच्या मूलभूत प्रश्न आहेत हेच प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न होलार समाज सामाजिक संस्था करत आहे लवकरच तारीख आपणास कळवली जाईल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी संपर्क 9764969074/7972140451

Featured Post

📚 **स्पर्धा परीक्षा अभियान – English अभ्यास (मुलांसाठी)** 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था, पुणे** 🗓 **कालावधी : ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ (विशेष अभ्यास आराखडा)** ──────────────────────────────────────── 📢 **सविस्तर अभ्यास नियोजन (Website साठी):** 🔹 **📅 दिनांक ११ एप्रिल २०२६** 👉 Parts of Speech (Noun, Pronoun, Verb) 👉 Basic Sentence Formation 👉 20 Vocabulary Words (Meaning + Use) 🔹 **📅 दिनांक १२ एप्रिल २०२६** 👉 Tense (Present Tense – Types & Examples) 👉 Fill in the Blanks Practice 👉 20 Vocabulary Words + Revision 🔹 **📅 दिनांक १३ एप्रिल २०२६** 👉 Tense (Past Tense – Types & Examples) 👉 Error Detection Practice 👉 Synonyms / Antonyms (20 Words) 🔹 **📅 दिनांक १४ एप्रिल २०२६** 👉 Future Tense + Sentence Practice 👉 Reading Comprehension (1 Passage) 👉 Vocabulary Revision + Daily Test 🔹 **📅 दिनांक १५ एप्रिल २०२६** 👉 Mixed Grammar Practice (All Topics Revision) 👉 Previous Year Questions (PYQ) 👉 Mini Mock Test (Analysis सहित) ──────────────────────────────────────── 📌 **विद्यार्थ्यांसाठी सूचना :** 1. दररोज दिलेला अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे 2. Vocabulary वही स्वतंत्र ठेवावी 3. Mock Test नंतर चुका समजून घ्याव्यात 4. दररोज किमान 1 तास English सराव करावा 5. सातत्य ठेवा – यश नक्की मिळेल ──────────────────────────────────────── 🎯 **उद्दिष्ट :** विद्यार्थ्यांचा English विषय मजबूत करून स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ──────────────────────────────────────── 🌟 **प्रेरणादायी विचार :** *"रोज थोडं शिका, पण नियमित शिका!"* ✊ जय होलार समाज 🌐 holarsamajsamajiksanstha.blogspot.com ────────────────────────────────────────

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts