मा.सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे यांच्या आदेशानुसार प्रशासकीय . विभागीय कार्यशाळा जाहीर . महाराष्ट्रातील होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक,व सर्वागीण विकास व्हावा यासाठी महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात प्रत्येक विभागामध्ये प्रशासकीय विभागीय कार्यशाळा घेतल्या जाणार 2024 श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने पहिला टप्पा फेब्रुवारी लातूर येथे प्रशासकीय एक दिवशीय विभागीय कार्यशाळा घेतली जाणार आहे.तरी बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद,/धाराशिव या जिल्ह्यातील समाज बांधवांनी लातूर येथे कार्यशाळेत वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा दुसरा टप्पा मार्च मध्ये औरंगाबाद येथे प्रशासकीय एक दिवशीय विभागीय कार्यशाळा निश्चित औरंगाबाद ,छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी ,हिंगोली या जिल्ह्यातील समाज बांधवांनी औरंगाबाद विभागीय कार्यशाळेत वेळेत उपस्थित राहावे. तिसरा टप्पा ठाणे येथे प्रशासकीय एक दिवशीय विभागीय कार्यशाळा निश्चित घेतली जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,या जिल्ह्यातील समाज बांधवांनी ठाणे येथे कार्यशाळेस वेळेत उपस्थित राहुन सहकार्य करावे. चौथा टप्पा नागपूर येथे प्रशासकीय एक दिवशी विभागीय कार्यशाळा निश्चित घेतली जाणार आहे भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, या जिल्ह्यातील समाज बांधवांनी नागपूर येथे कार्यशाळेत वेळेत उपस्थित राहावे पाचवा टप्पा अमरावती येथे प्रशासकीय एक दिवशी विभागीय कार्यशाळा निश्चित घेतली जाणार आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, या जिल्ह्यातील समाज बांधवांनी अमरावती येथे कार्यशाळे मध्ये अडचणीवर सखोल मार्गदर्शक केले जाणार कार्यशाळेचे ठिकाण तारीख वेळ आपणास लवकरच कळवली जाईल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे संपर्क 97 64 96 90 74/ 79 72 14 0 451
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-