डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. कार्यालय येथे 8 जानेवारी 2024 रोजी चर्मउद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. धम्म ज्योती गजभिये साहेब यांचे स्वागत करताना श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. धम्मज्योती गजभिये साहेब यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे . त्यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाचे अध्यक्ष व बार्टीचे महासंचालक सुनील वारे साहेब पुणे यांचे फुलबुके देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी बार्टीचे सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थी राजाराम ऐवळे, सिताराम ऐवळे, विशाल जावीर, बार्टीचे लोखंडे साहेब त्यावेळी उपस्थित होते. तसेच मा. धम्म ज्योती गजभिये साहेब महामंडळाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी या महामंडळाला लिडकॉमची जोड देत महामंडळा अंतर्गत अनेक उपक्रम राबविले. होलार चर्मकार, ढोर, मोची समाजातील युवकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदतीच्या योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम गजभिये यांनी केले. लीडकॉमच्या माध्यमातून हंगामी काळात राज्यात 25 हाजार युवकांना चर्मउद्योगाचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली. उद्योग वाढवण्यासाठी पोलीस विभागास चामड्याच्या वस्तूचा पुरवठा करण्याबाबतचा नवीन प्रस्ताव केला आहे .त्यांच्या निवडीमुळे महामंडळाच्या योजना आधी प्रभावीपणे राबविल्या जातील आणि समाजातील युवकांना लाभ मिळवून देण्यासाठी मदत होईल, अशी भावना सर्व स्तरावर व्यक्त होत आहे. होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. आपला विश्वासू नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष
Featured Post
