🌹 **मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक धन्यवाद!** 🌹 **श्रीनिवास अशोक देवकते** यांना होलार जातीचे **जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन!** 💐🎉 त्यांच्या वैधता प्रमाणपत्राच्या कामासाठी कुटुंबीयांनी संस्थेशी संपर्क साधल्यानंतर, **होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे साहेब** यांनी “काळजी करू नका, तुमच्या भाच्याचे वैधता प्रमाणपत्र करून देऊ,” असा विश्वास दिला आणि त्या शब्दाला जागत **सातत्यपूर्ण पाठपुरावा, मार्गदर्शन व प्रशासकीय सहकार्याच्या माध्यमातून हे काम पूर्ण करून दाखवले.** हीच आहे संस्थेच्या **निःस्वार्थ, प्रामाणिक आणि समाजहिताच्या कार्याची खरी ओळख!** 🙏 संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी व समाजबांधवांना **जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, शिक्षण, शासकीय योजना व विविध प्रशासकीय अडचणींबाबत कोणताही मोबदला न घेता मार्गदर्शन, मदत व सहकार्य** केले जात आहे. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मोठी मदत होत आहे. **श्रीनिवास अशोक देवकते यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेला हा मनःपूर्वक अभिप्राय संस्थेच्या कार्याला मिळालेली एक सुंदर पावती आहे.** 🌹 श्रीनिवास यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी **मनःपूर्वक शुभेच्छा!** 📚✨ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संस्थेवरील विश्वास व प्रेमाबद्दल **मनःपूर्वक आभार!** 🙏 **“समाजाच्या हक्कासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा… विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निःस्वार्थ सेवा!”** 🌺 **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** 🌺 **शिक्षण • संघटन • स्वाभिमान** **ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था**
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-