नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

🌟 *मोफत माहिती – महा योजना दर्शन* 🌟 प्रस्तुत – होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था) 👤 *संस्थापक अध्यक्ष* श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे 👨‍🏫 *मार्गदर्शक तज्ञ* श्री. सिताराम विठ्ठल ऐवाळे (लकडेवाडी, ता. जत, जि. सांगली) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📅 *आजची योजना माहिती (दिनांक: 08/04/2026)* ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👩 *महिला योजना* 👉 मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. अर्ज प्रक्रिया काही ठिकाणी सुरू असून बँक खाते व आधार लिंक आवश्यक आहे. 🚜 *शेतकरी योजना* 👉 पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 मदत मिळते. पुढील हप्ता लवकरच जमा होणार असून e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. 👉 नमो शेतकरी महा सन्मान निधी राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक लाभ दिला जातो. PM Kisan सोबत जोडलेली योजना आहे. 🎓 *विद्यार्थी / स्पर्धा परीक्षा* 👉 MahaDBT शिष्यवृत्ती योजना SC / ST / OBC / EWS विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. काही अर्जांची अंतिम तारीख जवळ आली आहे. 💼 *रोजगार योजना* 👉 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तरुणांना प्रशिक्षणासोबत मानधन दिले जाते. ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. 👉 स्किल इंडिया मिशन मोफत कौशल्य प्रशिक्षण व रोजगार संधी उपलब्ध. 🏥 *आरोग्य योजना* 👉 आयुष्मान भारत योजना ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा उपलब्ध. 👉 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्रातील नागरिकांसाठी कॅशलेस उपचार सुविधा. 📢 *महत्वाचे अलर्ट* ⚠️ PM Kisan साठी e-KYC तात्काळ पूर्ण करा ⚠️ शिष्यवृत्ती अर्ज उशीर करू नका ⚠️ सर्व योजनांसाठी आधार व बँक खाते लिंक आवश्यक ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📌 *आजच पहा आणि लाभ घ्या!* 🌐 वेबसाईटवर *https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/* 🕙 *दररोज सकाळी 10 वाजता नवीन अपडेट* “विश्वासार्ह माहिती, सोपी मराठीत” ━━━━━━━━━━━━━━━━

Featured Post

📢 *महाराष्ट्रातील सर्व होलार समाज बांधवांना महत्त्वाचे आवाहन* 📢 होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे IS0 9001 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांच्या विविध शासकीय, आर्थिक, शैक्षणिक व महामंडळाशी संबंधित अडचणींचा राज्यस्तरीय आढावा घेण्यात येत आहे. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी. सध्या अनेक समाज बांधवांना खालीलप्रमाणे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे: * कर्ज प्रकरण मंजूर असूनही रक्कम न मिळणे * अर्ज करूनही कर्ज मंजूर न होणे * प्रलंबित कर्ज प्रकरणे * व्यवसायासाठी मदत न मिळणे * प्रशिक्षण योजनांचा लाभ न मिळणे * स्टॉल / परवाना संदर्भातील समस्या * शिष्यवृत्ती / शैक्षणिक योजनांमधील अडचणी * शासकीय योजनांची माहिती न मिळणे * महामंडळ कार्यालयीन कामांमध्ये अडचणी * इतर सामाजिक, शैक्षणिक किंवा आर्थिक समस्या तरी महाराष्ट्रातील ज्या समाज बांधवांना अशा प्रकारच्या समस्या किंवा अडचणी आहेत त्यांनी आपली संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे पाठवावी: 📌 *आवश्यक माहिती:* १) पूर्ण नाव २) गाव / तालुका / जिल्हा ३) मोबाईल नंबर ४) कोणत्या योजनेसाठी अर्ज केला आहे ५) अडचणीचे स्वरूप ६) अर्ज क्रमांक / कागदपत्रे (असल्यास) समाज बांधवांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व अडचणी व प्रलंबित प्रश्न एकत्रित करून संबंधित स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असून ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. ⚠ *जास्तीत जास्त समाज बांधवांनी आपली माहिती पाठवावी व हा संदेश महाराष्ट्रभर शेअर करावा.* धन्यवाद. श्री. बबनराव करडे नायब तहसीलदार संस्थेचे सल्लागार श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts