वेबसाईट 🌙 **सूचना अधिकृत अपडेट – होलार समाज जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र अभियान महाराष्ट्र** 🌙 ⏰ **रात्री 12.00 वाजता प्रसिद्ध करण्यात येत आहे** आज दिनांक **22 जानेवारी** रोजी *होलार समाज जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र अभियान महाराष्ट्र* हे नियोजनानुसार यशस्वीपणे पार पडले. अभियानामध्ये लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्राबाबत सविस्तर, अचूक व उपयुक्त मार्गदर्शन देण्यात आले. हे अभियान **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य** (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था) यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अभियानाचे मार्गदर्शन **मा. श्री. बबनराव करडे** (माजी नायब तहसीलदार, संस्थेचे सल्लागार व अभियान मार्गदर्शक) यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली अभियान यशस्वी झाले. सर्व सहकार्यकर्ते व लाभार्थी बांधवांचे मनःपूर्वक आभार. अभियान पुढील दिवसांतही नियोजनानुसार सुरू राहील. — *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य*