केंद्र व राज्य सरकारकडून अनुसूचित जाती-जमाती व इतर वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. तथापि, प्रशासकीय मर्यादा, माहितीअभाव व प्रभावी अंमलबजावणीच्या कमतरतेमुळे या योजना अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. परिणामी, समाजातील अनेक गरजू नागरिक विविध शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर होलार सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त) या संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने संस्था केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे, तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास समस्या व अडचणी आणून देण्याचे कार्य प्रभावीपणे करीत आहे. या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात संस्थेला यश आले आहे. तसेच होलार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने मार्गदर्शन, समुपदेशन व पाठपुरावा करते. समाजातील प्रलंबित प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणणे, त्यावर तोडगा काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, तसेच गरज भासल्यास प्रशासनास वेळोवेळी स्मरण करून देणे हे कार्य संस्था प्रामाणिकपणे करीत आहे.
Featured Post
ऐतिहासिक विभागीय कार्यशाळा उपस्थित राउपण्याबाबत संस्थेच्या वतीने आव्हान मा.बबन करडे नायब तहसीलदार संस्थेचे सल्लागार
होलार समाजाच्या विभागीय कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे महाराष्ट्रव्यापी आवाहन✓ # 🚩 होलार समाजाच्या प्रश्नांसाठी निर्णायक संवादाची संधी! 🚩 ...