होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ISO 9001:2015 – आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे वंचित होलार समाज बांधवांसाठी – जात प्रमाणपत्र विशेष अभियान श्री. बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे मुख्य सल्लागार यांच्या सल्ल्याने अँड. जी .एन . ऐवळे कायदे तज्ञ तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील अनेक वंचित होलार समाज बांधवांकडे आजही जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण, नोकरी, शासकीय योजना आणि इतर हक्कांपासून ते वंचित राहतात. या समस्येची गंभीरता लक्षात घेऊन होलार समाज सामाजिक संस्था यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या वतीने तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, महसूल विभाग, बार्टी (पुणे) आणि समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयातून विशेष जात प्रमाणपत्र अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत : तालुका व गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत समाजातील लोकांना विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया व पडताळणीबाबत मार्गदर्शन व मदत केली जाणार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांचे आवाहन नामदेवराव आयवळे यांनी अनेक महत्त्वाचे संदर्भ देत असे सांगितले की : “जात प्रमाणपत्र मिळवणे ही केवळ कागदपत्रांची प्रक्रिया नसून समाजाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक सामाजिक बांधिलकी आहे. प्रत्येक समाज बांधवाने या प्रक्रियेत स्वतःहून पुढाकार घ्यावा, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि नियमित पाठपुरावा करावा.” तसेच, आवश्यक कागदपत्रांची माहिती, अर्ज प्रक्रिया व अन्य सर्व मार्गदर्शनासाठी होलार समाज सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा असेही त्यांनी आवर्जून सांगितले. होलार समाज बांधवांसाठी आवाहन ज्या समाज बांधवांकडे जात प्रमाणपत्र नाही किंवा पडताळणीची प्रक्रिया प्रलंबित आहे, त्यांनी त्वरित खालील गोष्टी कराव्यात : संस्थेशी संपर्क साधावा आवश्यक कागदपत्रांची यादी मिळवावी आगामी शिबिरांमध्ये सक्रीय सहभाग घ्यावा अर्ज व पडताळणीसाठी संस्थेच्या मदतीचा लाभ घ्यावा होलार समाज सामाजिक संस्था वतीने आपण सर्वांना आवाहन – “जात प्रमाणपत्र घ्या – आपला हक्क सुरक्षित करा!”