प्रेस विज्ञप्ती / अधिकृत निवेदन होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (आय.एस.ओ. 9001:2015 मानांकन प्राप्त — महाराष्ट्रातील पहिली संस्था) संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे विषय: होलार समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष — आंदोलन पुढे ढकलण्याबाबत. होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसंदर्भात सातत्याने राज्य शासनाशी पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु आजपर्यंत शासनाकडून या मागण्यांवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, याबाबत समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या संदर्भात, दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी, नवी पेठ, पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये, राज्य शासनाने पंधरा दिवसांच्या आत मागण्या मान्य न केल्यास अमर उपोषण आणि तीव्र आंदोलन (अन्नत्याग) करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु सध्या महाराष्ट्र राज्यात महानगरपालिका, ग्रामपंचायत आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यामुळे, संस्थेच्या वतीने नियोजित उपोषण आणि आंदोलन तात्पुरते पुढे ढकलण्यात येत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर अमर उपोषण व तीव्र आंदोलनाची नवी तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. तरी संबंधित शासन विभागांनी व माध्यमांनी याची योग्य ती नोंद घ्यावी, ही विनंती. आपला नम्र, (स्वाक्षरी) श्री. बबनराव करडे मा. नायब तहसीलदार तथा संस्थेचे सल्लागार अर्जुन खांडेकर संस्थेचे सचिव. जगन्नाथ पारसे पारसे खजिनदार श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.