होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे (ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था) महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना मनःपूर्वक धन्यवाद! होलार समाज सामाजिक संस्था सर्व मार्गदर्शक संस्था, हितचिंतक, व समाजातील बांधवांप्रती अत्यंत कृतज्ञता व्यक्त करते की, आपल्या सहकार्य व आशीर्वादामुळे आमच्या संस्थेला ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त झाले आहे. ही महाराष्ट्रातील पहिली अशी स्वयंसेवी संस्था (NGO) आहे, जिने हे प्रमाणपत्र प्राप्त केले असून, विशेष म्हणजे संपूर्ण ISO कागदपत्रे व नोंदपत्रे मराठी भाषेत तयार केली गेली आहेत — जे अभिमानास्पद आहे. या यशामुळे आम्हाला समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक उत्साहाने, दृढनिश्चयाने व पारदर्शकपणे कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आपले मार्गदर्शन, आशीर्वाद व सहकार्य भविष्यातही संस्थेला लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. आपला, श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष, होलार समाज सामाजिक संस्था, पुणे