अनुसूचित जातीतील वंचित घटक होलार समाजाच्या विविध मागण्यांकडे २०१३ पासून ते आज रोजी पर्यंत राज्य सरकारचे दुर्लक्षच.* होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे *पुणे* होलार सामाजिक संस्थेस ISO 9001 : 2015 आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मानांकन प्राप्त मिळाले त्याचा गौरव सोहळा पुणे येथे पत्रकार भवन सभागृहात 28 ऑक्टोबरला संपन्न झाला. हे प्रमाणपत्र ISO certifications चे डायरेक्टर्स डाॅ. माळी व सौ. शोभाताई माळी यांच्यातर्फे होलार समाजाच्या नेत्या श्रीमती मनिषाताई खांडेकर यांच्या उपस्थितीत होलार समाज सामाजिक संस्थेच्या श्री. नामदेवराव आयवळे यांना बहाल करण्यात आले. याप्रसंगी होलार समाजाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे मांडण्यात आल्या : १) होलार समाजाच्या विविध मागण्यांवर मंत्रालयांत बैठक घेण्यात यावी.यासाठी मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन, उपयुक्त करावे नम्र विनंती २) डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे मार्फत फेब्रुवारी २०१९ मध्ये सादर केलेला महाराष्ट्रातील होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती अभ्यास अहवाल तातडीने अमलात आणावा. ३) महाराष्ट्रातील होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी येणारे अडचणी सोडवण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा ४) होलार समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. ५) होलार समाजातील वाद्य कलावंतांना ₹ ७०००/- चे मानांकन मंजूर करण्यात यावे. ६) दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन होलार कुटुंबांना "दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना" अंतर्गत जमीन मिळावी. ७) संत रोहीदास चर्मकार विकास महामंडळ मुंबई यांच्या २८ जून २०२४ रोजीच्या बैठकीतील निर्णय घेण्यात आले आहेत ते त्वरित अंमलात आणावेत. ८) १५ ऑगस्ट २०२४ रोजी मा.मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या "होलार समाज आर्थिक विकास महामंडळ" या उपकंपनीचा विस्तार झाला असेल तर होलार समाजाचाच अध्यक्ष ची नियुक्ती करावी नसेल तर तात्काळ विस्तार करावा व अण्णासाहेब पाटील आथिर्क विकास महामंडळाला जो दर्जा व सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत, त्या सोयी सुविधा देण्यात याव्या. ९) विबवे बिबवेवाडी पुणे परिसरामध्ये जागा उपलब्ध करून सभागृह बांधण्यात यावी.कारण या परिसरामध्ये होलार समाज मोठ्या प्रमाणात राहत आहेत. "होलार समाज सामाजिक संस्था" केवळ मागण्या मांडत नाही, तर प्रशासनाशी समन्वय व आंतरराष्ट्रीय प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन (ISO 9001:2015) आणि संघटित प्रयत्नांच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहे. या व इतर मागण्याचे निवेदन पुण्यातील पत्रकार परिषदेत नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक/अध्यक्ष - होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सरकारला दिले. तसेच केंद्र व राज्य शासनाने होलार समाजाच्या या मागण्यांचा त्वरित सकारात्मक विचार करून, लवकरात लवकर त्या मार्गी लावून, होलार समाजाच्या संपूर्ण विकासासाठी पावले उचलावीत असे सांगितले. शासनाने या बाबतीत चालढकल न करता पंधरा दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आमरण उपोषण व तीव्र आंदोलन केले जाणार आहे. उपोषणाची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ही माहिती पुण्यातीत पत्रकार परिषदेत होलार समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी दिली. याप्रसंगी शिक्षणतज्ज्ञ श्री. विवेक गुप्ते, सामाजिक कार्यकर्ते श्री. रविकांत आदरकर व ISO सल्लागार श्री. सुहास गोळे व होलार.समाज सामाजिक संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. शोभाताई ऐवळे संस्थेचे सचिव अर्जुन खांडेकर आदि मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी केलेल्या भाषणात शालेय अभ्यासक्रमात ISO प्रमाणकावरील धडे शालेय पुस्तकात समाविष्ट करावेत अशी महत्वाची सूचना डाॅ. माळी यांनी शासनास केली. तसेच ISO प्रमाणपत्रासंबंधी शासनाने समाजात जागरूकता निर्माण करावी अशीही त्यांनी शासनाला विनंती केली.