नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) (1 जून 1953 – 21 ऑगस्ट 2024) संस्थापक – "होलार समाज मानवता मंदिर", बोपोडी प्रेरणास्थान व मुख्य सल्लागार – "होलार समाज सामाजिक संस्था" होलार समाजाचे भिष्म पितामह, आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) यांचे 21 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झाले. समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाने मागे एक अपार सामाजिक कार्याचा वारसा सोडला आहे. मुळचे नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील असलेल्या गुरुजींनी 1976 मध्ये पुणे महानगरपालिका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. पण त्यांची खरी ओळख समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची होती. 1980 मध्ये "होलार समाज मानवता मंदिर" या महाराष्ट्रातील पहिल्या समाज मंदिराची स्थापना करून त्यांनी समाजजागृतीचा विडा उचलला. 1980 ते 1997 या काळात अंगणवाडी व बालवाडी चालवून समाजातील लहानग्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी व्यसनमुक्ती अभियान राबवले आणि असंख्य समाज बांधवांना नवजीवन दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत 1985 साली पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" बहाल केला. गुरुजींनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून, अनेक बांधवांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी होलार समाजाला एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजाला बंधुता, प्रेम, शिक्षण व समानतेचे मूल्य लाभले. त्यामुळेच संपूर्ण समाजाने त्यांना "भिष्म पितामह" आणि "समाजभूषण" अशा पदव्या बहाल केल्या. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर समाजासाठी अर्पण करणाऱ्या या थोर व्यक्तीचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने होलार समाजाने एक आधारस्तंभ गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे कार्य आमच्यासाठी सदैव दीपस्तंभ राहील.


 

Featured Post

📢 **महत्वाचे आवाहन – महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालकांसाठी** 🌟 **स्पर्धा परीक्षा व इंग्लिश मार्गदर्शन अभियान** 🌟 🏛 *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* *(ISO 9001:2015 मानांकन प्राप्त संस्था)* 👤 **संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** 📚 **अभियान मार्गदर्शक : सौ. सारिका रुपेश हातेकर** *(बँक मॅनेजर व संस्थेच्या सहसचिव)* --- 🎯 **विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी!** महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे **स्पर्धा परीक्षा व इंग्लिश मार्गदर्शन अभियान** सुरू करण्यात आले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी योग्य दिशा, नियोजन आणि इंग्लिशचे ज्ञान खूप आवश्यक आहे. याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. --- # 🎓 कोण सहभागी होऊ शकतात? ✔️ दहावीचे विद्यार्थी ✔️ बारावीचे विद्यार्थी ✔️ पदवीधर विद्यार्थी ✔️ MPSC / UPSC / पोलीस / बँक / इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी --- # 📚 काय शिकवले जाणार? ## 📘 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन • सामान्य ज्ञान • इतिहास • भूगोल • चालू घडामोडी • अभ्यासाचे योग्य नियोजन • प्रश्नपत्रिका सोडविण्याची पद्धत ## 📖 इंग्लिश मार्गदर्शन • Basic Grammar • Daily Use Sentences • Speaking Practice • Interview Preparation • आत्मविश्वासाने इंग्लिश बोलण्याचा सराव --- # 🌟 या अभियानाची वैशिष्ट्ये ✔️ अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन ✔️ सोप्या भाषेत शिकवणी ✔️ नियमित सराव व मार्गदर्शन ✔️ आत्मविश्वास वाढवणारे प्रशिक्षण ✔️ स्पर्धा परीक्षेसाठी मजबूत तयारी --- # 📝 नोंदणी आवश्यक सहभागी होण्यासाठी खालील माहिती पाठवा: • पूर्ण नाव • शिक्षण • मोबाईल नंबर • गाव / शहर --- # 📢 विशेष आवाहन 🙏 महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना नम्र विनंती: हा संदेश **प्रत्येक ग्रुपमध्ये, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा** 👉 एक विद्यार्थी पुढे गेला तर संपूर्ण कुटुंब पुढे जाते 👉 एक कुटुंब पुढे गेले तर समाज पुढे जातो --- 🌟 **“आजचा अभ्यास = उद्याचे यश”** 📚 **शिका – लढा – यशस्वी व्हा** 🤝 चला, जास्तीत जास्त विद्यार्थी या अभियानात सहभागी करून घ्या! ✊ **जय होलार समाज**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts