होलार समाज सामाजिक संस्था – महत्त्वपूर्ण शिष्टमंडळ बैठक मुंबईत यशस्वीरित्या पार पडली दिनांक: 30 जुलै 2025, ठिकाण: संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मुख्य कार्यालय, मुंबई होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त नोंदणीकृत संस्था असून, दिनांक 30 जुलै 2025 रोजी संस्थेचे शिष्टमंडळ श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे (संस्थापक अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महत्त्वपूर्ण मागण्यांसंदर्भात बैठक पार पडली. ही बैठक श्रीमती प्रेरणा देशभद्रतार (व्यवस्थापकीय संचालक, संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ) यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः NSFDC योजनेंतर्गत धनादेशांसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत, अनेकांनी पैसे भरूनही त्यांना लाभ मिळालेला नाही, तर काहींनी अर्ज करूनही मंजुरी मिळालेली नाही, याकडे संस्थेच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. संस्थेच्या वतीने 2023 पासून अद्यापपर्यंत एकही प्रकरण मंजूर न झाल्याबाबतची आकडेवारी सादर करताना समाजात यामुळे नाराजी आहे, हे व्यवस्थापकीय संचालकांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश व्यवस्थापकीय संचालकांनी दिले असून, सर्व विभागीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. या बैठकीत संस्थेचे खालील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते: श्री. बबनराव करडे (माजी नायब तहसीलदार, सल्लागार) श्री. बापू महादेव आयवळे (नेते) सौ. शोभा मॅडम (उपाध्यक्ष) श्री. जगन्नाथ पारसे (खजिनदार) श्री. अनिल गुळदगड (पुणे विभागीय अधिकारी) श्री. संजय कुमार जावीर (कार्याध्यक्ष, नवी मुंबई) श्री. सिताराम ऐवळे साहेब (जत) ही बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात आणि खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडली.