नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जात प्रमाणपत्र महत्वाचे होलार समाजासाठी लवकरच शिबिराचे आयोजन महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही हे प्रशासनाच्या वेळोवेळी निदर्शनात आणून देण्यात आले आहे. तसेच केंद्र सरकार राज्य सरकार विविध योजना राबवत आहे परंतु अजून त्या योजना तळागाळापर्यंत पोचलेल्या नाहीत कारण शासकीय यंत्रणाच अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाही होलार समाज दुर्लक्षित असा समाज आहे या समाजात शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे.. समाजाच्या जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्रासाठी होलार समाजाला ज्या अडचणी येतात त्या प्रमुख्याने सोडवल्या पाहिजे महाराष्ट्रातील होलार समाज जात प्रमाणपत्रापासून जे अध्याप वंचित आहे, त्यांच्या करिता विशेष अभियान तहसील व प्रांत कार्यालयामार्फत आवर्जून शिबिर राबविण्यात यावे यावर समितीमार्फत ही विशेष शिबिरे याचे आयोजन करण्यात यावे याकरिता महसूल विभाग, बार्टी, पुणे आणि समाज कल्याण विभाग यांच्या समन्वयातून तालुका व गाव पातळीवर देखील याबाबत विविध माध्यमातून जनजागृती तसेच प्रत्यक्षात शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी संस्थेने केली लवकरच शिबिर घेतली जाणार आहे. काही अडचणी आल्यास संस्थेची संपर्क साधावा मो. नंबर 97 64 96 90 74 -7972140451

Featured Post

**होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था* **संस्थापक अध्यक्ष :** मा. श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे --- ## जाहीर सूचना होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने मौजे कमलापूर, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे उभारण्यात येणाऱ्या **“होलार समाज बहुउद्देशीय हॉल”** या महत्त्वाकांक्षी वास्तूच्या **भूमिपूजन व पायाभरणी समारंभाचे** आयोजन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात येणार आहे. मान्यवरांच्या शुभहस्ते या वास्तूचे भूमिपूजन करून समाजासाठी भव्य इमारत उभी करण्याच्या दिशेने एक नवे पाऊल टाकण्यात येणार आहे. उद्घाटन समारंभाची अंतिम तारीख मान्यवरांच्या उपलब्ध वेळेनुसार लवकरच जाहीर करण्यात येईल. --- ## संस्थेचा उद्देश समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी या बहुउद्देशीय हॉलच्या माध्यमातून पुढील उपक्रम राबविण्याचा संस्थेचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे : * प्रशिक्षण केंद्र * स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन * संगणक व कौशल्य विकास प्रशिक्षण * महिला प्रशिक्षण केंद्र * सांस्कृतिक भवन * सभा व लग्न समारंभ सुविधा * बालवाडी व अभ्यासिका * योगा केंद्र * पोलीस व मिलिटरी भरती प्रशिक्षण * SET/NET, JEE/NEET इत्यादी परीक्षांसाठी मार्गदर्शन --- समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या या उपक्रमास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून सहकार्य करावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती. --- **संस्थेचे सल्लागार** मा. श्री बबनराव करडे (नायब तहसीलदार) **संस्थेचे सचिव** श्री अर्जुन खांडेकर **संस्थेचे खजिनदार** श्री जगन्नाथ पारसे

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts