नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय.एस्.ओ. 9001-2015 प्रामाणित संस्था ‐----------------------------------- मोफत सेवा खालील प्रमाणे एकच ध्यास समाज विकास संदर्भ: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, होलार समाज सामाजिक संस्था,पुणे यांच्या मागणी अनुसार घेतल्या जात आहे. ---------------------------------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे तथा आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त "विद्यमाने महाराष्ट्रातील होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी बार्टी संस्थेमार्फत विशेषतः विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेऊन त्यामध्ये युवकांना उद्योजकता प्रशिक्षण, ------------------------------------------ तसेच समाज कल्याण मार्फत राबवत असलेल्या विविध योजना स्वतंत्रपणे जिल्हास्तरावर होलार समाजाकरिता उच्च शिक्षण कार्यशाळा घेऊन होलार समाजाच्या जात प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र निर्गमित करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश. जसे की महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अडचणी सोडवण्याबाबत. समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वस्तीगृह प्रवेश परदेशात शिक्षणासाठी संधी जास्तीत जास्त मिळावी . जसे की होलार समाजाची ग्रामीण भागामध्ये गाव वस्ती आहे त्याठिकाणी समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती द्यावी. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजना, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर तसेच शैक्षणिक व आर्थिक उन्नतीच्या योजनेची माहिती द्यावी. तसेच जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शनासह बार्टी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण, यूपीएससी, एमपीएससी , आयबीपीएस, जेईई निट, इत्यादी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, आधीछत्रवृत्ती उपक्रमाबाबतही माहिती देण्यात येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील होलार समाजातील नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे. जसे की ही सर्व माहिती तालुका जिल्हा ग्रामीण भागापर्यंत पोहचवने गरजेचे आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यासा सर्वसाधारण आवश्यक असणारी माहिती तेच काम होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय. एस. ओ.9001-2015 प्रमाणित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे तुमच्या हक्काचा माणूस व शिष्टमंडळ करत आहे याची नोंद समाज बांधवांनी घ्यावी. माहितीसाठी संपर्क- 7972140451

Featured Post

भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) (1 जून 1953 – 21 ऑगस्ट 2024) संस्थापक – "होलार समाज मानवता मंदिर", बोपोडी प्रेरणास्थान व मुख्य सल्लागार – "होलार समाज सामाजिक संस्था" होलार समाजाचे भिष्म पितामह, आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) यांचे 21 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झाले. समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाने मागे एक अपार सामाजिक कार्याचा वारसा सोडला आहे. मुळचे नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील असलेल्या गुरुजींनी 1976 मध्ये पुणे महानगरपालिका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. पण त्यांची खरी ओळख समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची होती. 1980 मध्ये "होलार समाज मानवता मंदिर" या महाराष्ट्रातील पहिल्या समाज मंदिराची स्थापना करून त्यांनी समाजजागृतीचा विडा उचलला. 1980 ते 1997 या काळात अंगणवाडी व बालवाडी चालवून समाजातील लहानग्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी व्यसनमुक्ती अभियान राबवले आणि असंख्य समाज बांधवांना नवजीवन दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत 1985 साली पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" बहाल केला. गुरुजींनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून, अनेक बांधवांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी होलार समाजाला एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजाला बंधुता, प्रेम, शिक्षण व समानतेचे मूल्य लाभले. त्यामुळेच संपूर्ण समाजाने त्यांना "भिष्म पितामह" आणि "समाजभूषण" अशा पदव्या बहाल केल्या. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर समाजासाठी अर्पण करणाऱ्या या थोर व्यक्तीचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने होलार समाजाने एक आधारस्तंभ गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे कार्य आमच्यासाठी सदैव दीपस्तंभ राहील.

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts