नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे आय.एस.ओ.9001-2015 प्रामाणित संस्था संस्थापक अध्यक्ष नामदेवराव श्रीरंग आयवळे सातत्याने पाठपुरावा जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरच मिळणार ऑनलाइन होलार समाज सामाजिक संस्थेच्या प्रस्तावाला बार्टी, पुणे व राज्य सरकारची मान्यता जात वैधता प्रमाणपत्र हे लवकरच एका लिंकवर ऑनलाइन उपलब्ध होणार आहे त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण (संस्था), पुणे आणि टीसीएसच्या वतीने ही ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या प्रमाणपत्रात समाविष्ट केलेल्या छायाचित्रामुळे गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे. राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील नागरिकांना सरकारी नोकरी, शैक्षणिक, निवडणूक आणि सरकारच्या मागासवर्गीय राखीव ठेवलेल्या अन्य कोणत्याही कामासाठी मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याच्या प्रक्रियेदरम्यान अर्जदारांना कागदपत्राची पूर्तता करण्यास अडचणी येतात. त्यामुळे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र वेळेत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे अर्जदारांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. या पाश्नभूमीवर राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमात संगणकीय ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित आधार क्रमांकाचसह एकत्रीकरण असणार आहे. यात नाव, वडील किंवा पतीचे नाव, आधारमध्ये नमूद केलेले मूळ स्थान यासारख्या मूलभूत माहितीची तपासणी होईल आणि कागदपत्राच्या पडताळणीसाठी डीजी लोकर या आपसे एकत्रीकरण (इंटिग्रेशन) असणारा आहे. याबाबत टीसीएसने सादर केलेला प्रस्ताव बार्टीने राज्य सरकारला प्रस्ताव दाखल केला होता या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.


 

Featured Post

भावपूर्ण श्रद्धांजली आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) (1 जून 1953 – 21 ऑगस्ट 2024) संस्थापक – "होलार समाज मानवता मंदिर", बोपोडी प्रेरणास्थान व मुख्य सल्लागार – "होलार समाज सामाजिक संस्था" होलार समाजाचे भिष्म पितामह, आदरणीय भगवान हरिबा जावीर (गुरुजी) यांचे 21 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झाले. समाजाच्या उत्थानासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या या थोर व्यक्तिमत्वाने मागे एक अपार सामाजिक कार्याचा वारसा सोडला आहे. मुळचे नाझरे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथील असलेल्या गुरुजींनी 1976 मध्ये पुणे महानगरपालिका शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. पण त्यांची खरी ओळख समाजासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची होती. 1980 मध्ये "होलार समाज मानवता मंदिर" या महाराष्ट्रातील पहिल्या समाज मंदिराची स्थापना करून त्यांनी समाजजागृतीचा विडा उचलला. 1980 ते 1997 या काळात अंगणवाडी व बालवाडी चालवून समाजातील लहानग्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी व्यसनमुक्ती अभियान राबवले आणि असंख्य समाज बांधवांना नवजीवन दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत 1985 साली पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने त्यांना "आदर्श शिक्षक पुरस्कार" बहाल केला. गुरुजींनी समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवून, अनेक बांधवांना न्याय मिळवून दिला. महाराष्ट्रभर फिरून त्यांनी होलार समाजाला एकत्र आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या कार्यामुळे समाजाला बंधुता, प्रेम, शिक्षण व समानतेचे मूल्य लाभले. त्यामुळेच संपूर्ण समाजाने त्यांना "भिष्म पितामह" आणि "समाजभूषण" अशा पदव्या बहाल केल्या. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आयुष्यभर समाजासाठी अर्पण करणाऱ्या या थोर व्यक्तीचे योगदान कधीच विसरता येणार नाही. त्यांच्या जाण्याने होलार समाजाने एक आधारस्तंभ गमावला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली. तुमचे कार्य आमच्यासाठी सदैव दीपस्तंभ राहील.

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts