नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

महाराष्ट्रातील होलार समाज अथवा समाजातील जो वंचित घटकाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जात प्रमाणपत्र , जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी वेळेत करून घ्यावी. असे आवाहान होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी केले आहे. तसेच याबाबत संबंधित सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र निर्गमित करून उचित कार्यवाही करण्याबाबत विनंती केली आहे. तसेच मा. सुनीलजी वारे सर महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सर्व यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा तसेच 50 वर्षांपूर्वीची नोंद मिळण्याकरिता महसूल कार्यालयांमध्ये होलार समाजाला अडचणीचा सामना करावा लागत आहे. असे श्री. नामदेवराव आयवळे अध्यक्ष यांनी सातत्याने पाठपुरावा करून शासनाच्या निदर्शनात आणून देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, जात प्रमाणपत्र पडताळणी नियमांमध्ये नियम क्रमांक 4 (3) मध्ये खालील प्रमाणे नमूद केलेले आहे. ▪️ अर्जदार, वरील पोट- नियम( 2) चे नमूद केलेला कोणताही दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ असेल तर अशा बाबतीत, अर्जदार आपल्या शपथपत्रांमध्ये त्या विषयाचे कारण नमूद करील आणि सक्षम प्राधिकारी हा अर्ज तपासून पाहतील व दाखला देतील तसेच होलार समाजाला अथवा समाजातील जो वंचित घटक असेल त्यांना जात प्रमाणपत्र देताना काही कागदपत्राचा अभाव असल्यास गृहचौकशी करून त्यांचा अहवाल व उपलब्ध कागदपत्रे याचा विचार करून जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे . जेणेकरून होलार समाजाला शासकीय योजनेचा लाभ घेता येईल. काही अडचणी असल्यास संस्थेची संपर्क साधावा संपर्क क्रमांक 79 72 14 0451 या नंबरवर संपर्क साधावा संस्था आपणास माहिती मार्गदर्शन केले जाईल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी.

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts