नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

मंगळवार दि. 01.04. 2025 रोजी होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य संस्थेचे शिष्टमंडळ श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुर येथे विविध विषयाच्या निगडित असलेले अधिकारी यांच्याबरोबर नियोजित ठरल्याप्रमाणे बैठका मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्या. खालील प्रमाणे ▪️ निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी सोलापूर. ▪️ उपजिल्हाधिकारी( महसूल) सोलापूर. ▪️ सहआयुक्त समाज कल्याण विभाग सोलापूर. ▪️ अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर. ▪️ए.डी. चाबुकस्वर वसुली अधिकारी लीडकॉम सोलापूर. यांच्याबरोबर विविध विषयावर चर्चा झाली तसेच जिल्ह्यातील समाज बांधवांच्या विविध अडचणी संदर्भात संस्थेकडे लेखी अर्ज आले आहेत जसे की नोकरी रोजगार शिक्षण जात दाखला निवारा राज्य सरकारच्या अनेक योजना पासून समाज बांधव वंचित आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात आपल्या कार्यक्षेत्रातील होलार समाजाच्या वस्त्यांमध्ये होलार समाजासाठी असलेल्या शासकीय योजनेबाबत आपल्या स्तरावरून जनजागृती करण्याच्या दृष्टीने मेळाव्या आयोजित करावे ज्या ठिकाणी होलार समाजाची वस्ती आहे त्या ठिकाणी विभागाच्या योजनेची माहिती द्यावी यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबळीकरण योजना, बचत गट मिनी ट्रॅक्टर तसेच शैक्षणिक व आर्थिक उन्नतीच्या योजनेची माहिती तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी नियमांमध्ये नेयम क्रमांक 4 (3) मध्ये खालील प्रमाणे नमूद केलेले आहे. अर्जदार, वरील पोट-नेयम (2) चे नमूद केलेला कोणताही दस्तऐवज सादर करण्यास असमर्थ असेल तर अशा बाबतीत, अर्जदार आपल्या शपथपत्रांमध्ये त्या विषयाचे कारण नमूद करील आणि सक्षम अधिकारी त्यावर निर्णय घेईल.व होलार समाजाला अथवा समाजातील जो वंचित घटक असेल त्यांना जात प्रमाणपत्र देताना काही कागदपत्राचा अभाव असल्यास गृहचौकशी करून जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी जेणेकरून होलार समाजाला शासकीय योजनेचा लाभ घेता येईल. व ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत दिली जावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे पुणे. यांनी केली आहे या विषयावर वरील सर्व अधिकारी यांनी सखोल अभ्यास व विचार करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच लवकरच कारवाईला सुरुवात होणार आहे तसेच त्यावेळी उपस्थित शिष्टमंडळ खालील प्रमाणे ▪️ जगन्नाथ पारसे राज्य खजिनदार ▪️सौ. शोभा मॅडम उपाध्यक्ष राज्य ▪️ अक्षय भजनावळे इंजिनियर सांगोला. ▪️ सुरेश सदाशिव आयवळे सांगोला. नितीन ऐवळे सदस्य ▪️ सिताराम ऐवळे सदस्य ▪️ मारुती जावीर जत सदस्य ▪️ रुक्मिणी आयवळे सदस्य ▪️मलकारी करडे सदस्य जत. यांच्या उपस्थितीत बैठका उत्साहात संपन्न झाल्या होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव आयवळे पुणे.

Featured Post

वेबसाईटवर ## 🌸 महिला सशक्तीकरण अभियान – सविस्तर माहिती व अभ्यास आराखडा **दिनांक : २६ ते ३० मार्च २०२६** 🏛 *होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे* *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* --- ### 👤 नेतृत्व **संस्थापक अध्यक्ष :** श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे **महिला सशक्तीकरण अभियान – मार्गदर्शक :** सौ. शोभा नामदेव अहिवळे *(उपाध्यक्ष)* --- ## 📌 प्रस्तावना आजच्या आधुनिक युगात महिलांचे शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबन हे समाजाच्या प्रगतीचे मुख्य आधारस्तंभ आहेत. महिलांना सक्षम, आत्मनिर्भर आणि जागरूक बनवण्यासाठी *महिला सशक्तीकरण अभियान* राबविण्यात येत आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांना **ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि स्वावलंबन** प्रदान करणे हा आहे, ज्यामुळे त्या स्वतःच्या तसेच समाजाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. --- ## 🎯 अभियानाचे उद्दिष्ट * महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे * शिक्षण व कौशल्य विकासाला प्रोत्साहन देणे * महिला हक्क व कायद्यांची माहिती देणे * आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन करणे * आरोग्य व मानसिक स्वास्थ्याबाबत जागरूकता निर्माण करणे --- ## 🗓 दिवसनिहाय अभ्यास आराखडा --- ### 📅 २६ मार्च २०२६ – व्यक्तिमत्त्व विकास **विषय:** * व्यक्तिमत्त्व विकास * आत्मविश्वास वाढविण्याचे तंत्र * सकारात्मक विचारसरणी **सराव:** * स्वतःची ओळख (Self Introduction) तयार करणे * ५ मिनिटे बोलण्याचा सराव --- ### 📅 २७ मार्च २०२६ – महिला हक्क व सुरक्षा **विषय:** * महिला हक्क व कायदे * कार्यस्थळी सुरक्षा * सायबर सुरक्षा जागरूकता **सराव:** * महत्त्वाचे कायदे नोट्समध्ये लिहिणे * १० प्रश्नांचा सराव --- ### 📅 २८ मार्च २०२६ – आर्थिक स्वावलंबन **विषय:** * बचत व गुंतवणूक * बँकिंग मूलभूत माहिती * लघुउद्योग संधी **सराव:** * छोटा व्यवसाय प्लॅन तयार करणे * बचत योजना लिहिणे --- ### 📅 २९ मार्च २०२६ – आरोग्य व मानसिक सशक्तीकरण **विषय:** * महिला आरोग्य व पोषण * मानसिक आरोग्य जागरूकता * ताण-तणाव व्यवस्थापन **सराव:** * १ तास पुनरावलोकन * आरोग्यदायी सवयींची यादी तयार करणे --- ### 📅 ३० मार्च २०२६ – नेतृत्व व प्रेरणा **विषय:** * प्रेरणादायी महिला व्यक्तिमत्त्वे * नेतृत्व कौशल्य * लक्ष्य निश्चिती **सराव:** * स्वतःची उद्दिष्टे (Goals) लिहिणे * Mock Activity / Presentation --- ## 🎯 अभ्यासासाठी मार्गदर्शक सूचना ✔️ दररोज किमान २ ते ३ तास अभ्यास करावा ✔️ स्वतःच्या हस्ताक्षरात नोट्स तयार कराव्यात ✔️ शिकलेले ज्ञान प्रत्यक्ष जीवनात वापरावे ✔️ नियमित पुनरावृत्ती (Revision) करावी ✔️ शंका असल्यास त्वरित विचारणा करावी ## ✨ निष्कर्ष महिला सशक्तीकरण हे केवळ एका व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण समाजाच्या विकासाचे प्रतीक आहे. शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबन यांच्या जोरावर महिला समाजात मोठा बदल घडवू शकतात. या अभियानाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा हीच अपेक्षा. --- 🌸 **“सशक्त महिला हीच सक्षम समाजाची पायाभरणी आहे.”** 🤝 **एकत्र या – शिक्षण घ्या – स्वावलंबी बना** ✊ **जय होलार समाज**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts