नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

आज दिनांक 27.0 3. 2025 रोजी श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्थेच्या शिष्टमंडळाने मा. सुनीलजी वारे सर महासंचालक, डॉ बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे कार्यालयात भेट दिली त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी महाराष्ट्रातील वंचित होलार समाजाच्या सामाजिक आर्थिक व शैक्षणिक अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली जसे की होलार समाजातील तरुण-तरुणींना विविध पदावर घेण्यात यावे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडक संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी होलार समाजातील इच्छुक उमेदवारांना विविध पदावर घेण्यात यावे ही विनंती केली आहे. विभागाचे नाव पदाचे नाव. प्रशासन विभाग ( माहिती तंत्रज्ञान ) प्रकल्प व्यवस्थापक संशोधन. प्रकल्प व्यवस्थापक योजना आधीछावृत्ती आणि क्षमता दूत प्रकल्प व्यवस्थापक विस्तार व सेवा प्रकल्प व्यवस्थापक या पदावर शैक्षणिक व अनुभव असणारे समाजामध्ये तरुण-तरुणी आहेत. यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये इच्छुक उमेदवारांना या पदावर घेण्यात यावे अशी विनंती केली श्री.नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांनी केली आहे त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. या पदावर शैक्षणिक व अनुभव असणारे समाजामध्ये तरुण-तरुणीने होलार समाज सामाजिक संस्थेसी संपर्क साधावा मो.7972140451

Featured Post

📢 **महत्वाची सूचना – समाजासाठी मोफत मार्गदर्शन** 🏛 **होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *(ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* 👤 **संस्थापक अध्यक्ष : श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** --- समाजातील युवक, विद्यार्थी, महिला व सर्व समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेमार्फत **६ महत्त्वपूर्ण अभियान** राबविण्यात येत आहेत. --- ### 📚 **स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान** विद्यार्थ्यांना MPSC, UPSC व इतर स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दिशा, अभ्यास नियोजन व तज्ञ मार्गदर्शन दिले जाते. 👤 **मार्गदर्शक : सारिका रुपेश हातेकर (बँक मॅनेजर व संस्थेच्या सहसचिव)** --- ### 👩‍👧 **महिला सशक्तीकरण अभियान** महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी कौशल्य विकास, कायदेशीर माहिती, आरोग्य व स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन दिले जाते. 👤 **मार्गदर्शक : शोभा नामदेव आयवळे (संस्थेच्या उपाध्यक्ष)** --- ### 📄 **जात प्रमाणपत्र व जात पडताळणी मार्गदर्शन अभियान** जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी अचूक माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. 👤 **मार्गदर्शक : बबनराव करडे (नायब तहसीलदार व संस्थेचे सल्लागार)** --- ### 🚭 **कैलासवासी भगवान जावीर गुरुजी व्यसनमुक्ती अभियान** समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी जनजागृती व समुपदेशन. 👤 **मार्गदर्शक : रविकांत आगरकर (पुणे – व्यसनमुक्ती तज्ञ)** --- ### 💼 **युवा विकास अभियान** युवकांसाठी करिअर मार्गदर्शन, कौशल्य विकास, रोजगार संधी व कायदेशीर सल्ला यावर विशेष भर. 👤 **मार्गदर्शक : अँड जी. एन. (पुणे जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ, प्रमुख कायदे विशेष सल्लागार)** --- ### 💍 **सर्व धर्म समभाव वधू-वर सूचक अधिकृत अभियान (महाराष्ट्र राज्य)** समाजातील युवक-युवतींसाठी सर्व धर्म समभावातून योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी मार्गदर्शन व नोंदणी सुविधा. 👤 **मार्गदर्शक : शोभा महेश जोशी** --- ⚠️ **महत्वाची बाब :** या सर्व अभियानांमध्ये **मार्गदर्शन पूर्णपणे मोफत आहे.** ✅ कोणताही शुल्क नाही ✅ कोणताही मोबदला नाही ✅ पूर्णपणे समाजसेवेच्या भावनेतून मार्गदर्शन --- 📢 **म्हणूनच समाजातील जास्तीत जास्त बांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.** 🌐 **अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या :** *https://holarsamajsamajiksanstha.blogspot.com/* ❓ **काही शंका असल्यास ग्रुपवर विचारणा करावी.** --- 🌟 **प्रेरणादायी संदेश** **“ज्ञान, मार्गदर्शन आणि समाजसेवा — हेच आमचे ध्येय.”** 🤝 **एकत्र या – समाज घडवा** **जय होलार समाज ✊**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts