नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

दिनांक. 24. 2. 2025 रोजी होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेच्या शिष्टमंडळाने संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ सांगली कार्यालयात भेट दिली त्यावेळी लीडकॉमचे विभागीय अधिकारी यांनी अतिशय सुंदर माहिती दिली ते बोलत होते सांगली जिल्ह्यातून 50 ते 60 टक्के कर्ज प्रकरण होलार समाजाच्या फायली आहेत आम्ही हेड ऑफिसला मंजुरीसाठी पाठवून दिले आहेत. तसेच अध्यक्ष/सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली कार्यालयात भेट दिली त्यावेळी श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष बोलत होते की. महाराष्ट्रातील होलार समाजाच्या जातीच्या चुकीच्या झालेल्या नोंदीमुळे होलार समाजाला जातीचे प्रमाणपत्र व जातीची वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येत असलेल्या अडचणीमुळे होलार समाजाला कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही. होलार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत अडचणीचे निरसन करून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावेत तसेच बार्टी सांगली कार्यालयात भेट दिली त्यावेळी प्रकल्प अधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यावेळी त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 माहिती पुस्तक देऊन श्री. नामदेवराव आयवळे व शिष्टमंडळ यांचे स्वागत करण्यात आले.व समाज कल्याण विभागाच्या विविध योजना,बार्टी अंतर्गत कौशल्य विकास या विषयावर मार्गदर्शन केले. त्यावेळी आनंदा जावीर युवा नेते प्रभाकर केंगार पाटबंधारे अधिकारी. राजाराम गेजगे नेते चंद्रू केंगार युवा नेते . सुखदेव ऐवळे सामाजिक कार्यकर्ते ब्रह्मदेव गेजगे सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत या बैठका अतिशय उत्सवात संपन्न झाल्या आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव आयवळे पुणे .

Featured Post

 छान 👍 खाली **वेबसाईटवर टाकण्यासाठी सविस्तर मजकूर** देत आहे — **मंगळवार, 10 फेब्रुवारी 2020** दिनांकासह. हा मजकूर ब्लॉग/वेबसाईटसाठी योग्य, ...

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts