होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू मागील पाच वर्षात या संख्येने भरीव कार्य केले असून आज होलार समाजाला पडणाऱ्या प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. ती वापरून घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने सातत्याने पाठपुरावा.मा. महासंचालक बार्टी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली वंचित घटकातील होलार समाजाच्या विविध मागण्या बाबत. अनेक वेळा बैठका आयोजित करण्यात आल्या व अनेक निवेदन देण्यात आली काही मागण्या त्या मंजूर व्हाव्यात अशी विनंती श्री नामदेवराव आयवळे अध्यक्ष यांनी केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मागण्यावर मा. महासंचालक यांनी सूचनावर गंभीर्यपूर्वक विचार करून संबंधित विभागांना होलार समाजातील मागण्यांना न्याय मिळवून देण्यास बार्टी कटिबद्ध आहे असे बोलून दाखवले आणि बार्टीने तात्काळ होलार समाजाची दखल घेतली ही अत्यंत चांगली बाब आहे. महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी, पुणे मार्फत एक दिवशीय विशेषत: विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत.या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीची प्रक्रिया. अडचणी या विषयावर मार्गदर्शन व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया मार्गदर्शन तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, स्वयं सहाय्यता युवागट या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात आले आहे तसेच बार्टीमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन यूपीएससीत वंचित होलार समाजाच्या टक्का वाढावा, स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण योजनामार्फत विविध योजना यशस्वीपणे राबवल्या जात आहेत. यातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेत होलार विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा वंचित विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल सुरू व्हावी. यासाठी होलार समाज सामाजिक संस्थेचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-