होलार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्थेचे शिष्टमंडळाने पुणे येथे आज दि. 8.1. 2025 रोजी माननीय, सुनीलजी वारे सर महासंचालक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे मुख्य कार्यालयात यांचे फुल बुके देऊन स्वागत करण्यात आले त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सदस्य जगन्नाथ पारसे साहेब शोभा मॅडम राज्य उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात फुल बुके देऊन स्वागत करण्यात आले व समाजाच्या विविध अडचणी बाबत निवेदन देण्यात आले तसेच श्रीमती विद्या नाथा ऐवळे यांना फेब्रुवारी 2024 मध्ये बार्टीने वाटप केलेल्या एका प्रोग्रेस व एच आर,ए. रक्कम एक लाख 80 हजार अजून मिळालेली नाही ते मिळण्याबाबत महासंचालक यांच्या निदर्शनात आणून देण्यात आले त्यावेळी मा.महासंचालक यांनी तात्काळ श्रीमती विद्या नाथा ऐवळे यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले तसेच लातूर या ठिकाणी होलार समाजाचे कार्यकर्ते, शिष्टमंडळ सदस्य यांची एक दिवसीय विभागीय कार्यशाळा घेण्यात यावी तसेच या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थ यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्यासाठीची प्रक्रिया, अडचणी या विषयावर मार्गदर्शन व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया मार्गदर्शन तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना, बार्टीच्या विविध योजना या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात यावे. अशी मागणी संस्थेने महासंचालक यांच्याकडे केली महासंचालकांनी आश्वासन दिले आहे या जानेवारी मध्ये तात्काळ कार्यशाळा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत लवकरच कार्यशाळा लातूर येथे घेतली जाणार आहे कार्यशाळेची तारीख वेळ ठिकाण लवकरच कळवलं जाईल याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे पुणे.
Featured Post
