दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी होलार समाज सामाजिक संस्था पुणे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांच्या नेतृत्वात मा.सुनीलजी वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे कार्यालयात प्रत्यक्षात भेट घेऊन फुल बुके देऊन अभिनंदन स्वागत करण्यात आले कारण महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी,पुणे मार्फत विशेषता: विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याबद्दल माननीय सुनीलजी वारे सर महासंचालक यांचे हार्दिक अभिनंदन. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने. श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात तथा अथक प्रयत्नाने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. लातूर येथे एक दिवशीय विभागीय कार्यशाळा दिनांक. 21.1.2025 रोजी नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली. त्यावेळी लातूर सारख्या अतिदुर्गम भागातील सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून कार्यशाळा यशस्वी केली . तसेच दिनांक 10 .3. 2023 रोजी श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात पुणे विभागीय कार्यशाळा सांगोला येथे आयोजित करण्यात आली होती पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून सांगोला येथे कार्यशाळा यशस्वी केली. तसेच. दिनांक 17. 7.2023 रोजी श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील होलार समाजातील युवक- युवतींसाठी आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्ताने ऑनलाईन पद्धतीने एक दिवशीय कार्यशाळा यशस्वी केली. दिनांक 26. 9. 2023 रोजी श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नाशिक विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून कार्यशाळा यशस्वी केली. त्यामुळे होलार समाजाच्या विविध प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत. समाज बांधव त्याचा लाभ घेत आहे. तसेच महाराष्ट्रातील होलार समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्रित करण्यात होलार समाज सामाजिक संस्थेला यश येत आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना एकत्रित करून राज्य मेळावा आयोजित करावा अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे. सर्वांशी चर्चा करून ठिकाण तारीख कळवली जाईल. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे संपर्क.7972140451
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-