नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विकासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बार्टी,पुणे मार्फत विशेषता: विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत. त्याबद्दल माननीय सुनीलजी वारे सर महासंचालक यांचे हार्दिक अभिनंदन. मा. सुनीलजी वारे सर महासंचालक बार्टी, पुणे यांच्या मान्यतेने. श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात तथा अथक प्रयत्नाने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे. लातूर येथे एक दिवशीय विभागीय कार्यशाळा दिनांक. 21.1.2025 रोजी नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली. त्यावेळी लातूर सारख्या अतिदुर्गम भागातील सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून कार्यशाळा यशस्वी केली . तसेच दिनांक 10 .3. 2023 रोजी श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात पुणे विभागीय कार्यशाळा सांगोला येथे आयोजित करण्यात आली होती पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून सांगोला येथे कार्यशाळा यशस्वी केली. तसेच. दिनांक 17. 7.2023 रोजी श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील होलार समाजातील युवक- युवतींसाठी आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्ताने ऑनलाईन पद्धतीने एक दिवशीय कार्यशाळा यशस्वी केली. दिनांक 26. 9. 2023 रोजी श्री नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नाशिक विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सर्व जिल्ह्यातील होलार समाजातील बांधवांना एकत्रित करून कार्यशाळा यशस्वी केली. त्यामुळे होलार समाजाच्या विविध प्रश्न मार्गी लागताना दिसत आहेत. समाज बांधव त्याचा लाभ घेत आहे. तसेच महाराष्ट्रातील होलार समाज बांधव मोठ्या प्रमाणात एकत्रित करण्यात होलार समाज सामाजिक संस्थेला यश येत आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना एकत्रित करून राज्य मेळावा आयोजित करावा अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे. सर्वांशी चर्चा करून ठिकाण तारीख कळवली जाईल. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे संपर्क.7972140451

Featured Post

**होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे** *(ISO 9001 : 2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था)* **संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे** व संस्थेच्या शिष्टमंडळाने सातत्याने केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे तसेच **बार्टी, पुणेचे महासंचालक मा. श्री. सुनील वारे सर यांच्या मान्यतेने** **नागपूर विभागासाठी विभागीय कार्यशाळेस मान्यता मिळालेली आहे**, ही संपूर्ण होलार समाजासाठी अत्यंत अभिमानाची व ऐतिहासिक बाब आहे. 🙏 नागपूर विभागातील होलार समाजाला येणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेऊन **दि. 24 फेब्रुवारी 2026 रोजी**, सकाळी **10.00 ते सायंकाळी 5.30** या वेळेत **पंचायत समिती सभागृह, वरोरा** येथे **बार्टी, पुणे** मार्फत **होलार समाजासाठी एक दिवसीय विभागीय कार्यशाळा** आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थींना — ▪️ महसूल विभागामार्फत **जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया व येणाऱ्या अडचणी** ▪️ **जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र** प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन ▪️ **समाज कल्याण विभागाच्या विविध योजना** ▪️ **स्वयं-सहायता गट व युवक गट** या विषयांवर संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी **नागपूर विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यांतील** समाज बांधव, प्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच होलार समाजाच्या इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य यांनी **वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे**, असे आवाहन करण्यात येत आहे. श्री. बबनराव करडे माजी नायब तहसीलदार संस्थेचे मुख्य सल्लागार अँड. जी. एन.ऐवळे कायदे तज्ञ संस्थेचे सल्लागार. श्री. अर्जुन खांडेकर सचिव. श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार. **नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली** या सर्व जिल्ह्यांतील व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व तालुक्यांतील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ही कार्यशाळा यशस्वी करावी. ✨ *ही कार्यशाळा मिळवून देण्यासाठी मा. संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांची दूरदृष्टी, ठाम भूमिका व सातत्यपूर्ण प्रयत्न अत्यंत मोलाचे ठरले आहेत.* ✨ तसेच, या विभागीय कार्यशाळेस मान्यता दिल्याबद्दल **बार्टी, पुणेचे महासंचालक मा. श्री. सुनील वारे सर यांचे होलार समाज सामाजिक संस्था व संपूर्ण समाज बांधवांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व आभार.** 💐 **एकजूट, जागरूकता आणि संघटित प्रयत्नातूनच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे.**

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts