नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... संस्थेने स्थापन केलेल्या "राजमाता जिजाऊ महिला बचत गट" तर्फे संचलित "महिला लघुउद्योग" सुरू करण्यात आली असून, ज्या समाज बांधवांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

होलार समाजाच्या विकासासाठी स्वातंत्रपणे एक दिवशीय विभागीय कार्यशाळा लातूर मा. महासंचालक यांच्या मान्यतेने. होलार समाजाच्या विकासासाठी मा. महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवशी विभागीय कार्यशाळा घेतल्या जात आहे.एक इतिहास घडत आहे. तसेच श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावा महाराष्ट्रातील वंचित होलार समाजातील नवउद्योजक व उद्योजक होलार समाजाला जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता येणाऱ्या अडचणी व यूपीएससीत होलार विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा स्पर्धा परीक्षा पूर्वप्रशिक्षण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढावा. व बार्टी पुणे मार्फत कौशल्य विकासाच्या विविध योजनापर महत्वपूर्ण एक दिवशीय विभागीय कार्यशाळेचे आयोजन. डॉ . बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाची सामाजिक न्याय संस्था व होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक 21. जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11: ते सायंकाळी 5:30 वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण लातूर या ठिकाणी होलार समाजासाठी एक दिवशीय विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. एक दिवसीय विभागीय कार्यशाळा प्रामुख्याने खालील योजनेचे सादरीकरण होणार आहे. या कार्यशाळेमध्ये उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना महसूल विभागामार्फत जात प्रमाणपत्र मिळण्याकरिता प्रक्रिया. अडचणी या विषयावर मार्गदर्शन व जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया मार्गदर्शन. तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध योजना स्वयं सहाय्यता युवागट या विषयावर मार्गदर्शन. करण्यासाठी विविध संबंधित विभागांना आमंत्रित करण्यात आले आहे. तरी आपण स्वतः व आपल्या संघटनेचे प्रतिनिधी सदस्य व समाज बांधव यांनी उपस्थित राहावे. तसेच होलार समाज लातूर विभागामधील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी समाज बांधव विद्यार्थी कार्यकर्ते व होलार समाजाच्या इतर संघटना प्रतिनिधी यांना होलार समाज सामाजिक संस्थेने आमंत्रित केले आहे. वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आव्हान श्री बबन करडे मा.नायब तहसीलदार सातारा संस्थेचे सल्लागार व सौ. शोभा मॅडम राज्य उपाध्यक्ष. श्री. अर्जुन खांडेकर सचिव. श्री. जगन्नाथ पारसे खजिनदार

Featured Post

 

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts