नवीन वर्ष नवीन संकल्पना 2025 होलार समाज सामाजिक संस्था, पुणे प्रमाणक ISO. 9001- 2015 कलम 103 सतत सुधारणा यावर एक प्रकार प्रामाणित कार्य करण्याकरिता संस्थेच्या वतीने विशेष सर्वसाधारण सभा दिनांक 8.12. 2024 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे दुपारी 1 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे. यांच्या अध्यक्षतेत सभा मोठ्या थाटामाटात सुरू होऊन खालील विषयावर चर्चा करण्यात आल्या त्यावेळी संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच ह्या सर्वांनुमते मान्यता देण्यात आलेल्या आहेत ठराव क्रमांक 48 त्यावेळी संस्थेने घेतलेले निर्णय खालील प्रमाणे आहेत. 1 .विषय- महाराष्ट्रातील होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक ,व शैक्षणिक, अडी-अडचणी सोडवण्याकरिता. 2025 मध्ये संस्थेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकारी कार्यालय भेट देणार. 2 . महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांनो विविध आडचणीचा सामना करत आहात त्या लिखित स्वरूपात संस्थेकडे अर्ज करावेत म्हणजे तो अर्ज संस्था ज्या त्या विभागापर्यंत पोचून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार. 3 . संस्थेचे अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांनी आज संस्थेचे काही सदस्य यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदारी सोपवण्यात आल्या. होलार समाज सामाजिक संस्थेचे विभागीय अधिकारी. म्हणून नियुक्त्या 1 .श्री. बबनराव करडे संस्थेचे मुख्य सल्लागार. 2 .जी एन ऐवळे ज्येष्ठ वकील संस्थेचे कायदे सल्लागार प्रशासकीय विभाग- 3 .कोकण--- विभागीय अध्यक्ष अर्जुन खांडेकर. 4 . पुणे.--विभागीय अध्यक्ष. शोभा मॅडम 5 . औरंगाबाद--- विभागीय अध्यक्ष सौ. सारिका रुपेश हातेकर. 6 .नाशिक विभागीय अध्यक्ष श्री. जगन्नाथ पारसे 7 .अमरावती विभागीय अध्यक्ष. आत्माराम जावीर 8 .नागपूर विभागीय अध्यक्ष. श्री. अनिल गुलदगड. महाराष्ट्रातील होलार समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता अडचणीचा आल्यास संस्थेची संपर्क साधा संस्था योग्य मदत करेल.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-