होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने होलार समाजाच्या विविध मागण्या संदर्भात दिनांक.19/12/2024 रोजी श्रीमती प्रेरणा देशभ्रतार व्यवस्थापकी संचालक संतरोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई. तथा सह आयुक्त वस्तू व सेवाकर मंत्रालय मुंबई. यांच्या अध्यक्षतेखाली होलार समाज सामाजिक संस्था, पुणे या संस्थेच्या वतीने श्री.बबन करडे यांच्या मार्गदर्शनात राज्य उपाध्यक्ष सौ.शोभा मॅडम व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव आयवळे यांच्या नेतृत्वात व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यालय मुंबई येथे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांच्या शुभहस्ते व्यवस्थापकीय संचालक यांना फुल बुके देऊन स्वागत करण्यात आले. . त्यावेळी उपस्थित राज्य खजिनदार जगन्नाथ पारसे व रामचंद्र ऐवळे कळंबोली ज्येष्ठ नेते सिताराम ऐवळे विजय केगार ज्येष्ठ नेते तसेच लीडकॉमचे सर्व विभागीय अधिकारी सदरहू बैठकीमध्ये खालील प्रमाणे मुद्द्यावर चर्चा करण्यात आली मुद्दे 1 . प्रशिक्षण केंद्र व उद्योजक तयार करण्याबाबत. मौजे कमलापूर, ता. सांगोला, जिल्हा. सोलापूर येथे प्रशिक्षण केंद्र उद्योग तयार करून देण्याबाबत आयुक्त समाज कल्याण पुणे यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. 2 . होलार समाजास नामनिर्देशत करण्याबाबत. 3 . महामंडळाच्या थकीत कर्जाबाबत. 4 . पिच परवाना व स्टॉल इत्यादी बाबत. ग्रामपंचायत स्तरावर पिच परवाना तसेच महापालिका क्षेत्रात स्टॉल इत्यादीबाबत शहर विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या सचिवांना मा. मुख्यमंत्री महोदय यांनी आढावा बैठकीत निर्देश दिले आहेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. 5 . MCED यांच्याशी संपर्क साधून क्लस्टर उभारण्याबाबत पुणे येथे होलार समाजाकरिता महिलांकरिता क्लस्टर सादर करण्याबाबत. 6 . होलार समाजाचे कर्जाच्या प्रकरणाबाबत. होलार समाजाचे कर्जाचे प्रकरणांना तात्काळ मंजुरी देण्यात आलेली आहे प्रत्येक लाभार्थ्यांना कर्जासंदर्भात मेल पाठवला जाणार आहे . ज्यांना मेल आला नसेल त्यांनी संस्थेची संपर्क साधावा. 7 . महामंडळाकडून होलार ,चांभार ,ढोर, मोची, समाजाला मदत करण्यासाठी स्वातंत्र्य हेल्पलाइन मागणी केली होती सकारात्मक कार्यावाही करण्यात येईल अशी गव्ही देण्यात आली. वरील प्रमाणे मा. व्यवस्थापकीय संचालक लीडकॉम यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच जवळ जवळ दोन तास बैठक सुरू होती विविध विषयावर चर्चा करण्यात आली मोठ्या थाटामाटात खेळीमेळीत वातावरणात बैठक संपन्न झाली त्याबद्दल व्यवस्थापकीय संचालक यांचे मनापासून अभिनंदन. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-