होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य. संस्थेचे गुणवत्ता धोरण प्रामाणक आय. एस .ओ .9001 : 2015 संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम 2023 ते 2024 ही संस्था अनुसूचित जाती अंतर्गत वंचित जाती मधील होलार समाजाच्या सर्वागीण उन्नतीसाठी काम करते. आम्ही आमचे कामकाज - आय .एस. ओ . 9001 : 2015 ह्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार करतो. आम्ही त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. आम्ही वंचित होलार समाजासाठी/त्यांच्या सर्व गरजांचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. शिका संघटित व्हा संघर्ष करा मी हमाली करीन मजुरी करीन वाटेल ते करीन पण मुलांना शिकवीन मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 16.1.2023 रोजी वंचित घटकातील होलार समाजाच्या समस्या सोडवण्यासंदर्भात तसेच मागण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठकीस बार्टी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच होलार समाजाचे प्रतिनिधी उपस्थित संपन्न झाली त्यावेळी नामदेव आयवळे संस्थापक अध्यक्ष केलेल्या मागण्यावर मा. धम्मज्योती गजभिये सर महासंचालक यांनी सूचनावर गंभीरतापूर्वक विचार करून संबंधित विभागांना होलार समाजातील मागण्याना न्याय मिळवून देण्यास बार्टी कटिबद्ध असल्याचे सांगून होलार समाजाच्या त्यांनी खालील प्रमाणे बार्टी अंतर्गत कार्यरत असलेल्या विभागामार्फत कामकाजाची जबाबदारी संबंधित विभागांना प्रकल्प व्यवस्थापक यांच्यावर सुपूर्त केले सदर बैठकीमध्ये खालील प्रमाणे. होलार समाजाच्या विकासासाठी मा. महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक ही एक ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद करण्यात आले. होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे. मार्फत विशेषत: विभागीय स्तरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेतल्या जात आहेत त्यामुळे होलार समाजाला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. त्याबद्दल बार्टीचे महासंचालक यांचे समाजाच्या वतीने मनापासून अभिनंदन .
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-