होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य. नोंदणीकृत संस्था प्रामाणिक आय. एस. ओ. 9001-2015 संस्थेच्या वतीने मतदान अभियान म्हणून महाराष्ट्रातील होलार समाज सामाजिक संस्थेने ठरवलेल्या गोष्टी खालील कृती/गोष्टी कराव्यात १) सकाळी 11 वाजेचे आत पुर्ण परीवारला सोबत घेऊन मतदान करून येणे २) आपल्या परिवाराचा फोटो समाजाचे ग्रुप वर टाकणे ३) समाजातील किती जणांचे मतदान झाले ते फोन करून विचारणे. २ वाजेला अध्यक्ष व कार्यकारणी चा ऑफिस ला बसुन आढावा घेणे ४) ज्यांचे मतदान राहिले आहे त्यांना सतत फोन करुन विनंती करणे ५) एकुण किती मतदान होते आणि किती झाले याची आकडेवारी रात्री समाजाचे ग्रुप वर टाकणे ६) दिवसभरात कोणी मतदान केले नाही व त्याचे कारण काय त्याचीही यादी ग्रुप वर टाकणे ७) १००% मतदान व्हावे असा संकल्प केला आहे, प्रत्येक समाजाने असे देशहिताची जागरुकता दाखवावी🙏 प्रत्येक समाज -- तेली माळी साळी शिंपी खाटीक वाणी कुणबी ब्राम्हण लिंगायत प्रत्येक बाराबलोती इत्यादी समाज अशा प्रकारचे मतदान अभियान राबवु शकतो 100% मतदान *प्रत्येक समाजात हे झाले पाहीजे..* *प्रत्येक समाजाने स्वत:च्या बांधवाचे नेतृत्व व जबाबदारी स्वीकारली पाहिजे..* आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस दिखावा नाही फक्त काम श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-