होलार समाजाच्या इतिहासात प्रथमच 2023 ते 2024 होलार समाज सामाजिक संस्थेने समाज उपयोगी केलेले कार्य . तमाम महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांना कळविण्यात आनंद वाटतो की. श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष व शिष्टमंडळ मंडळ यांनी मा. महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी, पुणे. यांच्याकडे सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा केल्यामुळे मिळालेले यश. मा. महासंचालक बार्टी पुणे कार्यालयात वेळोवेळी भेटणे बैठका घेऊन विनंती करण्यात आली होती. की होलार समाजाच्या विकासासाठी बार्टी पुणे मार्फत विशेषता: विभागीय स्वतरावरील स्वतंत्रपणे कार्यशाळा घेण्यात यावी अशी विनंती करण्यात आली होती त्या विनंतीला मान देऊन मा .महासंचालक बार्टी पुणे यांनी विभागीय कार्यशाळा दि.10 मार्च,2023 रोजी पंचायत समिती सभागृह, सांगोला जिल्हा सोलापूर येथे एक दिवशीय विभागीय कार्यशाळा तात्काळ घेण्याचे आदेश देण्यात आले . मोठ्या थाटामाटात कार्यशाळा संपन्न झाली. तसेच दि. 26 सप्टेंबर, 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाज कल्याण नाशिक या ठिकाणी होलार समाजाचे कार्यकर्ते ,शिष्टमंडळ सदस्य यांची एक दिवशीय विभागीय कार्यशाळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. त्यामध्ये युवकांना उद्योजकता प्रशिक्षण , समाज कल्याण मार्फत राबविण्यात असलेल्या विविध योजना. जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत मार्गदर्शन. बार्टी संस्थे मार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण यूपीएससी एमपीएससी, आयबीपी एस जेईई .इत्यादी. स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण, अधिछत्रवृत्ती उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली व होलार समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यातील होलार समाजातील युवक-युवतीसाठी" स्वातंत्र्य आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्ताने"ऑनलाइन पद्धतीने एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात यावी अशी मागणी केली होती. त्या विनंतीला मान देऊन उपरोक्त विषयास अनुसरून मा. महासंचालक, बार्टी, पुणे . त्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक. 17 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील होलार समाजातील युवक -युतीसाठी" आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्ताने"ऑनलाइन पद्धतीने एक दिवशीय कार्यशाळांचे आयोजित करण्यात आले. होते. इतिहासात प्रथमच घडत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील होलार समाजामधील युवक-युवतींना बार्टी, पुणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अधिछात्रवृती(BANRF),lBPS पोलीस व मिलिटरी, सेट /नेट,जेईई/नीट,MPSC,UPSC,इ. स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन व विविध क्षेत्रातील विषयावर मार्गदर्शनपर ऑनलाईन पद्धतीने एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 17 .7. 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता आंतरराष्ट्रीय न्याय दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यांमधील होलार समाजातील युवक युवतींनी सदर कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी जागृत होण्यास मदत झाली. महासंचालक यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-