श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था पुणे. यांनी दिनांक 11. 11 .2024 रोजी मा. सुनील वारे सर महासंचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर बार्टी पुणे. कार्यालयात भेट घेऊन महासंचालक यांना निवेदन देण्यात आले जसे की महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांच्या अडचणी जसे की फेब्रुवारी 2024 मध्ये बार्टीने वाटप केलेल्या प्रोग्रेस व एच आर. फेलोशिप रक्कम मिळाली नाही.व विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी बाबत. अडचणी संदर्भात होलार समाजातील विद्यार्थ्यांनी समाज बांधवांनी होलार समाज सामाजिक संस्थेकडे अनेक तक्रारी अर्ज आले आहेत. की वरील विषयावर अडचणी येत आहेत. बघा साहेब समाज बांधवांना काय उत्तर देऊ समजत नाहीये तुम्हीच सांगा तसेच साहेब आपण स्वतः लक्ष घालून होलार समाजाला वेळेत व सुलभ रीतीने स्थानिक पातळीवर चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्ष/सचिव यांना देऊन सुद्धा जात पडताळणी अध्यक्ष सचिव टाळाटाळ करत आहेत आपल्या भाषेत त्यांना समज देण्यात यावी.ही विनंती. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे पुणे .
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-