होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य रजि.नं.53452/ पुणे गणपत नगर बिबेवाडी पुणे 37 ही संस्था समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम करते. आम्ही आमचे कामकाज ISO 9001:2015 ह्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या अनुसार करतो. आम्ही त्या प्रणालीत सातत्याने सुधारणा करण्यासाठी कार्यरत आहोत. आम्ही आम्हाला लागू असलेल्या सर्व कायद्याचे पालन करतो. आम्ही आमच्या समाजासाठी/ त्यांच्या सर्व गरजाचे पालन करण्यास वचनबद्ध आहोत. आज दिनांक 21-10-2024 रोजी होलार समाज सामाजिक संस्थेची ISO 9001-2015 बैठक : संपन्न झाली बैठकीचे इतिवृत्त : या बैठकीचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे. बैठकीचे मार्गदर्शनक. मा. श्री. सुहास नारायण गोळे पद आय एस ओ व्यवस्थापन प्रणाली सल्लागार. यांनी अतिशय उत्तम असे मार्गदर्शक केले. 1. ISO 6 बोधवाक्ये 2. 5.1.1 अध्यक्ष : कर्तव्य, अधिकार 3. 5.1.2 समाजाकडे सतत लक्ष हवे 4. 5.1.2 कायदापालनाकडे लक्ष हवे 5. 5.2 गुणवत्ता धोरण (साधार 5 वाक्ये) 6. 5.3 पदाधिकाऱ्यांची कर्तव्ये व अधिकार 7. 5.3 संघटना-तक्ता 8. व्यवस्थापकीय प्रतिनिधी 9. प्रक्रिया-दृष्टिकोण 10. जोखीम-व्यवस्थापन त्यावेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित वरील विषयावर सर्वानुमते मान्यता देण्यात आलेले आहेत.
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-