होलार समाज सामाजिक संस्था, पुणे. कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था अतिशय महत्वाची बैठक. दिनांक.5.10.2024 रोजी संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे वेळ दुपारी 2 या वेळेत संपन्न झाली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांच्या अध्यक्षतेत बैठक सुरू होऊन खालील विषयावर चर्चा करण्यात आली आजच्या बैठकीचे अध्यक्ष सन्माननीय श्री बबनराव करडे माझी नायब तहसीलदार सातारा व संस्थेचे सल्लागार यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे. माननीय सुहास गोळे. आय एस ओ - 9001 प्रशिक्षक हे बोलत होते. संस्थेबाबत नामांकन मिळण्याबाबत (आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच होलार समाज सामाजिक संस्था ही 80 टक्के त्या दिशेने काम चालू आहे असे सुहास गोळे साहेब यांनी बोलून दाखवले. विषय:- होलार समाजाच्या विविध अडचणी बाबत चर्चा करण्यात आली त्यावेळी अध्यक्ष श्री बबन करडे साहेब यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन करून समाज बांधवांना कशा पद्धतीने लाभ मिळेल या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच . श्री नामदेवराव आयवळे बोलत होते कै. भगवान हरिबा जावीर गुरुजी समाज भूषण यांचे विचार सर्व सामान्य पर्यंत पोहोचवण्याचं काम ही संस्था पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. तसेच त्यावेळी उपस्थित अर्जुन खांडेकर संस्थेचे सचिव, जगन्नाथ पारसे चंद्रकांत केगार , सिताराम ऐवळे, शोभा जोशी, सारिका हातेकर, यांनी ही आपली मत व्यक्त केली. तसेच बैठक खेळीमेळीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाली आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे. पुणे. . .
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-