श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था यांनी आज दिनांक 9.9.2024 रोजी प्रत्यक्षात बार्टी, पुणे. कार्यालयात मा. सुनीलजी वारे सर महासंचालक यांची भेट घेऊन अनुसूचित जाती प्रवर्गातील शैक्षणिक वर्ष 2024 .25 करिता घेण्यात येणाऱ्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी या व्यवसायीक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राखीव, अनुसूचित प्रवर्गामधुन प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांना जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी प्रक्रियाबाबत काही अडचणीचा सामना करावा लागत आहे तसेच आम्ही त्या समाजात जन्म घेऊन सुद्धा जातीचा दाखला काढता येत नाही कारण आमचे पूर्वजण शाळेतच गेले नाहीत त्यामुळे आमचे आजोबा/पंजोबा यांचा जातीचा संदर्भात कोणतेही कागदपत्र उपलब्ध होत नसल्याने आम्ही काय करावे आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती केली. तसेच मा. सुनीलजी वारे सर महासंचालक यांनी सांगितले की महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील उमेदवार असेल तर स्थानिक पातळीवर चौकशी करून व सुलभ रीतीने जात प्रमाणपत्र वैधता पडताळणी प्रमाणपत्र बाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली. त्यावेळी संस्थेचे संचालक मंडळ मंदा मॅडम शोभा मॅडम यांच्या उपस्थित. तसेच ज्या उमेदवारांना अडचण येत असेल तर त्यांनी त्यांचे नाव शिक्षण पूर्ण पत्ता पाठवण्याची कृपा करावी होलार समाज सामाजिक संस्थेशी संपर्क साधावा संस्था योग्य ते मदत करेल संस्थेचा संपर्क नंबर 7972140451