होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्थेच्या वतीने. होलार समाजाचे प्रेरणास्थान व समाज भूषण नेते कै. भगवान हरिबा जावीर गुरुजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोक सभा रविवार दि.1 /9/2024 रोजी दुपारी 3 वाजता संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे संपन्न झाला. तसेच या. सभेचे अध्यक्ष श्री नामदेवराव आयवळे यांनी भूषवले त्यावेळी बिबेवाडी परिसरातील मोठ्या संख्येने समाज बांधव नातेवाईक पाहुणे उपस्थित होते सचिन करडे, दयानंद जावीर, शितल करडे, सारिका हातेकर, रूपाली जावीर, बापू आयवळे, जगन्नाथ पारसे, अर्जुन खांडेकर, सहदेव जावीर, दिलीप करडे अन्नदाते, जि. एन.ऐवळे वकील साहेब अन्नदाते. सिद्धनाथ जावीर नायब तहसीलदार माळशिरस, मयुरी जावीर, शोभा जोशी मॅडम, यां सर्वांनी गुरुजीच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला पुष्प अर्पण करण्यात आले तसेच पसायदान व दोन मिनिट शांत राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जावीर कुटुंबाच्या दुःखामध्ये संस्था व सर्व उपस्थित समाज बांधव आपण वेळेत वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार व्यक्त केले नामदेवराव आयवळे यांनी. आपला विश्वासू तुमच्या आमच्या हक्काचा माणूस श्री नामदेवराव आयवळे पुणे
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-