संत रोहिदास चर्मोउद्योग व चर्मकार विकास महामंडळ मुंबई. गेली दहा वर्षे बंद अवस्थेत पडलेल महामंडळ पुनर्जीवित करून होलार, चांभार, ढोर, मोची, इत्यादी समाजासाठी भरीव कार्य करणारे अधिकारी मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक लीडकॉम मुंबई यांचे मनःपूर्वक अभिनंदन श्री. नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा. मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक चर्मउद्योग विकास महामंडळ तथा राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाचे सदस्य महामंडळाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी या महामंडळाला लीडकांची जोड देत महामंडळ अंतर्गत अनेक उपक्रम राबविले तसेच होलार,चांभार, ढोर, मोची समाजातील युवकांना स्वयरोजगारासाठी आर्थिक मदतीच्या योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम गजभिये यांनी केले लीडकॉमच्या माध्यमातून हंगामी काळात राज्यात 25 हजार युवकांना चर्मोउद्योगाचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली. उद्योगाचा समाज लाभ घेता आहे. उद्योग वाढवण्यासाठी पोलीस विभागास चमड्याच्या वस्तूचा पुरवठा करण्याबाबतचा नवीन प्रस्ताव केला आहे. त्यांच्या निवडीमुळे मंडळाच्या योजनांना अधिक प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. आणि समाजातील युवकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत होईल अशी भावना महाराष्ट्रातून समाज बांधव व्यक्त करत आहेत. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आपले अभिनंदन साहेब समाजाला मुख्य प्रवाहात अनाल अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे धन्यवाद साहेब महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित होलार, चांभार, ढोर, मोची इत्यादी समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्र रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रल्हात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत आपण तळागाळातील समाज बांधवांपर्यंत विविध योजनांची माहिती दिली जात आहे .व लाभार्थ्यांचे चेक मंजुरी पत्र देणे व चेक वाटप करणे तसेच प्रलंबित कर्ज प्रकरणे तात्काळ मंजुरी देणे इत्यादी कामे संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाले आहेत. कुंडल ता.पलूस जिल्हा सांगली येथे दिनांक 30/07/2024 रोजी होलार समाजाच्या गल्लीत जाऊन छोटेखानी कार्यक्रम घेऊन विविध योजनेची माहिती दिली व माहिती पुस्तके वाटण्यात आली इतिहासात प्रथमच घडत आहे. आपला विश्वासू नामदेवराव आयवळे संस्थापक अध्यक्ष