मा. धम्मज्योती गजभिये साहेब व्यवस्थापकीय संचालक चर्मउद्योग विकास महामंडळ तथा राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळाचे सदस्य महामंडळाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी या महामंडळाला लीडकांची जोड देत महामंडळ अंतर्गत अनेक उपक्रम राबविले तसेच होलार,चांभार, ढोर, मोची समाजातील युवकांना स्वयरोजगारासाठी आर्थिक मदतीच्या योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम गजभिये यांनी केले लीडकॉमच्या माध्यमातून हंगामी काळात राज्यात 25 हजार युवकांना चर्मोउद्योगाचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली. उद्योग वाढवण्यासाठी पोलीस विभागास चमड्याच्या वस्तूचा पुरवठा करण्याबाबतचा नवीन प्रस्ताव केला आहे. त्यांच्या निवडीमुळे मंडळाच्या योजनांना अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील आणि समाजातील युवकांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत होईल अशी भावना महाराष्ट्रातून समाज बांधव व्यक्त करत आहेत. त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तसेच महाराष्ट्रातील होलार समाजाची सामाजिक, आर्थिक, व शैक्षणिक, प्रगती अजूनही पुरेशी झालेली नाही. अतिशय मागासलेली वंचित होलार जात आहे. महाराष्ट्रातील सर्व होलार समाजाचे कर्ज प्रकरण मंजूर कराल व एजंट पासून समाज मुक्त कराल असा आम्हाला विश्वास आहे आपण स्वतःविशेष लक्ष देऊन होलार समाजाला मुख्य प्रवाहात अनाल अशी अपेक्षा आहे. होलार समाज सामाजिक संस्था पुणे सर्व पदाधिकारी सदस्य समाज बांधव श्री नामदेवराव श्रीरंग आयवळे अध्यक्ष
Popular Posts
-
-
होलार समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेली होलार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, ही ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था असून समाजासाठी आशेचा किरण ठरत आहे. श्री.बबनराव करडे मा. नायब तहसीलदार सातारा तथा संस्थेचे सल्लागार यांच्या सल्ल्याने. अँड.जि.एन.ऐवळे संस्थेचे कायदेतज्ञ सल्लागार यांच्या सहकार्याने. समाजाच्या न्याय-हक्कांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे, समाजाच्या अडचणी ओळखून वास्तववादी उपक्रम राबवणे, हे या संस्थेचे वैशिष्ट्य असून त्यामुळेच ही संस्था समाजात एकमेव दिशादर्शक म्हणून ओळखली जाते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे यांनी होलार समाजातील विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे समाजातील हजारो युवकांना विविध शासकीय योजनांच्या अनुदानित प्रशिक्षणांचा आणि सुविधा योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असून अनेक कुटुंबांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडला आहे. शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कृतिशील विचारांचा वारसा माझ्या कार्याचा आधार आहे. हा वारसाच मला समाजासाठी काम करण्याची ऊर्जा देतो. लोकांच्या दैनंदिन आयुष्यातील प्रश्न हे माझ्या कामाचे सदैव केंद्रबिंदू राहिले आहेत. समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, महिलांचे सबलीकरण, जनतेपर्यंत शासकीय सुविधा पोहोचवणे, विकासकामांचा पाठपुरावा करणे, महिलांसाठी बचत गट व व्यवसाय प्रशिक्षण, जात प्रमाणपत्र व जातीवैधता प्रमाणपत्राबाबत मदत, तसेच चुकीच्या नोंदींमुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन — अशा अनेक क्षेत्रांत संस्था सातत्याने कार्यरत आहे. तसेच समाजातील युवक-युवतींना कौशल्यविकास प्रशिक्षण देऊन उद्योग व लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे हेही संस्थेचे एक महत्त्वाचे ध्येय आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे कार्य करण्याची मला एक संधी मिळत आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.
-