नोंदणी क्र. F-53452 पुणे, महाराष्ट्र राज्य. आय.एस्.ओ. 9001-2015 प्रमाणित संस्था.
मा. श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे, यांना मिळालेले पुरस्कार व सन्मानपत्र..




..... महिला सशक्तीकरण अभियान, स्पर्धा परीक्षा अभियान, युवक विकास अभियान व जात प्रमाणपत्र व जात पडताळणी अभियान शासकीय मार्गदर्शन व मदत होलार समाज सामाजिक संस्था UPSC / MPSC ची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आॅनलाईन मार्गदर्शन केले जात असून, प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ठीक. 2 ते 4 वाजेपर्यंत असते, "मान्यवर शिक्षक" मार्गदर्शन करतात, तरी विद्यार्थी वर्गाने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व आॅनलाईन उपस्थित राहण्यासाठी त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा.

  

मा. श्री.माणिकराव भडगे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थेस भेट.. संस्थेचे मुख्य कार्यालय गणपत नगर बिबेवाडी पुणे येथे दिनांक 3/3/2024 रोजी सदिच्छा भेट दिली दुपारी 3 वा. संस्थेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच फुल बुके देऊन मा. भगवान जावीर गुरुजी होलार समाजाचे प्रेरणास्थान व व समाज बांधवांनी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.नामदेवराव आयवळे व अर्जुन खांडेकर सचिव श्री .अमित जावीर मानवता मंदिराचे अध्यक्ष.व श्री.संभाजी चौगुले श्री.विशाल जावीर श्री संजय अहिवळे श्री .विजय आयवळे श्री राजेंद्र केंगार श्री किरण भडगे श्री. परशुराम ढोबळे श्री नवनाथ ऐवळे यांच्या हस्ते जाती व्यवस्थेचे निर्मूलन हे पुस्तक भेट देउन स्वागत करण्यात आले श्री भगवान जावीर गुरुजी मार्गदर्शन करताना म्हणाले माणिकराव भडांगे तुम्हाला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस एवढे मोठे पद मिळाले आहे त्याचा वापर समाजाच्या हितासाठी करावा समाज तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचेल तसेच नामदेवराव आयवळे बोलत होते होलार समाजाच्या हिताचे एक तरी काम करावे समाज तुमच्या पाठीशी उभा राहील.व अमित जावीर साहेब बोलत होते प्रत्येक शहरात गावात तालुक्यात जिल्ह्यात तरुणांचे युवा गट तयार करून त्यांना योग्य दिशा दिली जावी तळागाळातील समाज बांधवांना न्याय मिळावा ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी श्री माणिकराव भडांगे साहेब बोलत होते मला मिळालेल्या पदाचा वापर मी समाजासाठी जास्तीत जास्त कल्याणा करता करेन समाज बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवावा व समाज हिताची कामे घेऊन माझ्याकडे आले पाहिजे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे बोलून सर्वांची मने जिंकली तसेच बिबेवाडी परिसरातील समाज बांधव तसेच शोभा महेश जोशी रंजना आयवळे संभाजी तोरणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला


 

Featured Post

🌿 **दैनिक प्रमाण-विचार** 🌿 📅 दिनांक: 12 एप्रिल 2026 🏢 **होलार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे** 🏅 ISO 9001:2015 आंतरराष्ट्रीय गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली मानांकन प्राप्त संस्था 👤 संस्थापक अध्यक्ष: श्री. नामदेवराव श्रीरंग आयवळे --- ✨ **आजचा विचार:** “संस्थेची प्रगती ही सतत आढावा, सुधारणा आणि योग्य निर्णय यावर आधारित असते.” --- 🔍 **आजचा प्रमाण मुद्दा (External / Internal):** 👉 *तांत्रिक प्रगती (External Factor)* 📌 **स्पष्टीकरण:** नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याने संस्थेची कार्यक्षमता वाढते. डिजिटल साधनांचा स्वीकार केल्याने काम जलद, अचूक आणि पारदर्शक होते. --- 💡 **आजची कृती (Action Point):** ✔ संस्थेमध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा आढावा घ्या ✔ नवीन डिजिटल साधनांचा विचार करा ✔ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या --- 🌱 **संदेश:** “दररोज छोटा बदल, मोठी प्रगती घडवतो.”

About Me

होलार समाज सामाजिक संस्था, पुणे

Popular Posts